Akshay Kumar : अक्षय कुमारच्या ताफ्यातील सुरक्षा कारचा भीषण अपघात झाला असून रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच रिक्षाचालकाची प्रकृती गंभीर असल्याचं समोर आलं आहे. त्याच्या भावाने हात जोडून लोकांना मदतीची विनंती केली आहे.
Akshay Kumar : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या ताफ्यातील सुरक्षा कारचा भीषण अपघात झाला असून रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. अक्षय कुमार 19 जानेवारी 2026 रोजी पत्नी ट्विंकल खन्नासोबत लग्नाच्या 25 व्या वाढदिवसानिमित्तचा कार्यक्रम साजरा करून मुंबईला परतला होता. दरम्यान, अभिनेत्याशी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर आली. सोमवारी रात्री सुमारे 9 वाजता अक्षय कुमारच्या ताफ्यातील एका गाडीचा अपघात झाला. ही घटना त्यावेळी घडली, जेव्हा अक्षय आणि ट्विंकल विमानतळावरून घरी जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता आपल्या ताफ्यासोबत जात असताना त्याच्या सुरक्षा गाडीची एका रिक्षासोबत धडक झाली. एका मर्सिडीज कारने अक्षयच्या एस्कॉर्ट कारला धडक दिली, त्यामुळे एस्कॉर्ट कार पुढे असलेल्या रिक्षावर आदळली. या अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले आणि रिक्षाचालकाच गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात आणखी एक व्यक्तीही जखमी झाली आहे. आता या प्रकरणावर रिक्षाचालकाच्या भावाचा व्हिडीओ समोर आला आहे. त्याने आपल्या जखमी भावासाठी हात जोडत मदतीची विनंती केली आहे.
रिक्षाचालकाच्या भावाने केली मदतीची मागणी
ANI शी बोलताना रिक्षाचालकाचा भाऊ मोहम्मद समीर म्हणाला,"अपघाताची घटना रात्री साधारण 8 ते 8.30 दरम्यान घडली. माझ्या भावाची रिक्षा पुढे होती आणि त्यामागे अक्षय कुमारची इनोव्हा आणि एक मर्सिडीज येत होती. मर्सिडीजने इनोव्हाला धडक दिली आणि त्यामुळे इनोव्हा रिक्षावर आदळली. परिणामी, माझा भाऊ आणि रिक्षामधील आणखी एक प्रवासी रिक्षाखाली दबले गेले. संपूर्ण रिक्षा उद्ध्वस्त झाली असून माझ्या भावाची अवस्था अतिशय गंभीर आहे. आमची फक्त एवढीच विनंती आहे की माझ्या भावावर योग्य उपचार व्हावेत आणि रिक्षाला झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी. आम्हाला याशिवाय काहीही नको. आम्ही खूप गरीब आहोत, इतका खर्च आम्हाला परवडणारा नाही. परिस्थिती खूप गंभीर आहे. फक्त माझ्या भावावर उपचार व्हावेत, एवढीच आमची मागणी आहे".
advertisement
#WATCH | Mumbai | Brother of the auto-rickshaw driver who got injured in the accident, Mohammed Sameer says, "This incident happened around 8 to 8.30 pm. My brother was driving the rickshaw when Akshay Kumar's Innova and a Mercedes were behind it. When the Mercedes hit the… https://t.co/u1jS3IArC7pic.twitter.com/WWub77zYX6
अक्षय कुमारच्या ताफ्यातील कार अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये स्थानिक नागरिक आणि पोलिस कर्मचारी अपघातग्रस्त रिक्षामधून एका जखमी व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढताना दिसत आहेत. जुहू पोलिसांनी मर्सिडीज चालकाविरुद्ध बेदरकारपणे वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
#WATCH | Mumbai | Two people got injured following a collision between two cars and an auto rickshaw in the Juhu area last night. Bollywood actor Akshay Kumar's escort car was involved in the accident. The injured person was taken to a nearby hospital for treatment: Mumbai Police… pic.twitter.com/OTunJVmnNq
सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओंवरून हा अपघात किती भीषण होता, हे स्पष्ट दिसते. या अपघातात रिक्षाचालक आणि आणखी एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती आहे. दृश्यांमध्ये अक्षय कुमारच्या ताफ्यातील एक गाडी उलटलेली दिसत आहे, तर रिक्षाचे मोठे नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. अपघात इतका भीषण होता की काही क्षणांतच आजूबाजूला मोठी गर्दी जमली.