पापा कर्ज में हैं! मतदान करून बाहेर आलेल्या अक्षय कुमारचे मुलीने धरले पाय, झालं काय? VIDEO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांमध्ये मतदानात अक्षय कुमार, सुनिल शेट्टी, आमिर खान, हेमा मालिनी, शशांक केतकर आदी कलाकारांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला. यातील अभिनेता अक्षय कुमारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
महाराष्ट्रात आज 29 महानगरपालिका संस्थांमध्ये मतदान सुरू आहे. सकाळपासून जोरदार मतदानाला सुरुवात झाली आहे. कलाकारांनीही सकाळीच मतदान केंद्रावर मतदानासाठी हजेरी लावली होती. अभिनेता अक्षय कुमार प्रत्येक मतदानावेळी सकाळी लवकर मतदान करून बाहेर पडतो. यावेळीही अक्षय कुमारने सकाळीच मतदान करत आपला मतदानाचा हक्क बजावला. अक्षय कुमार मतदान केंद्रावरून बाहेर येत असताना त्याला एक मुलगी भेटली. त्या मुलीने अक्षय कुमारकडे एक विनंती केली. त्यानंतर ती अक्षय कुमारच्या पायाही पडली.
अक्षय खन्ना मतदान करून बाहेर पडला. तो त्याच्या कारच्या दिशेनं जात असताना एका लहान मुलीने त्याला हाक मारली. तिची हाक ऐकून अक्षय थांबला. त्या मुलीच्या हातात एक कागद होता. ती म्हणाली, वडिल खूप मोठ्या कर्जात आहेत. प्लिज त्यांना बाहेर काढा.
advertisement
मुलीचं बोलणं ऐकून अक्षय कुमारही भावुक झाला. त्याने तिला त्याच्या टीम मेंबरकडे फोन नंबर देण्यास सांगितलं. अक्षयचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पाहून मुलीने अक्षय कुमारचे पाय धरले. अक्षय कुमारने तिला वर उचललं आणि बेटा असं करू नको असं सांगितलं. अक्षय कुमार कारमध्ये बसून निघून गेला.
अक्षय कुमारच्या या व्हिडीओनं चाहत्यांची मनं जिंकली आहे. एका चाहत्यानं लिहिलंय, "सलमान खान, अक्षय कुमार मोठ्या मनाचे आहेत." दुसऱ्याने लिहिलंय, "अक्षय कुमार सर खूप चांगलं काम केलं तुम्ही." आणखी एकानं लिहिलंय, "अक्कीचं मन किती साफ आहे. याचमुळे तो लेजेंड आहे."
advertisement
advertisement
अक्षय कुमारने मतदान केल्यानंतर मीडियाशी बोलताना सगळ्यांना मतदान करण्याचं आवाहन केलं. तो म्हणाला, आज तो दिवस आहे तेव्हा रिमोट कंट्रोल आपल्या हातात असतो. मी सगळ्या मुंबईकरांना आवाहन करतो की तुम्ही मतदान करा.
अक्षय कुमारबरोबरच अभिनेता सुनिल शेट्टी, जॉन अब्राहम, हेमा मालिनी, गुलजार, तमन्ना भाटिया, आमिर खान सारख्या बॉलिवूड कलाकारांनीही मतदानाचा हक्क बजावला. संस्कृती बालगुडे, उर्मिला कानिटकर, प्राजक्ता माळी, शशांक केतकर, हेमंत ढोमे, क्षिती जोग सारख्या मराठी कलाकारांनीही मतदानचा हक्क बजावत मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 15, 2026 12:49 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
पापा कर्ज में हैं! मतदान करून बाहेर आलेल्या अक्षय कुमारचे मुलीने धरले पाय, झालं काय? VIDEO









