अक्षय कुमारचं ते फेमस गाणं, ज्याच्या शूटींगवेळी मुलींनी 100 अंडी फेकून मारली, सेटवर नेमकं काय घडलं?

Last Updated:

Bollywood Actor : बॉलिवूडच्या फेमस अभिनेत्याला मुलींना अंडी फेकून मारली होती. तरीही तो काहीच बोलला नाही. एका प्रसिद्ध कोरिओग्राफने त्याच्याबद्दल अनेक खुलासे केलेत.

News18
News18
बॉलिवूडमध्ये अनेक किस्से आहेत जे चाहत्यांना गमतीशीर वाटत असतील. बॉलिवीडच्या एका अभिनेत्यावर मुलींनी चक्क 100 अंडी मारली होती. तरीही हा अभिनेता काहीही बोलला नाही किंवा त्याने कोणतीही तक्रार केली नाही. त्याने अनेक सिनेमे हिट दिले आहेत. त्याने फक्त सिनेमेच नाहीत तर चांगली गाणीही दिली आहेत, जी ब्लॉकबस्टर झाली.
काय म्हणाले कोरिओग्राफर ?
हा अभिनेता म्हणजे बॉलिवूडचा खिलाडी सुपरस्टार अक्षय कुमार आहे. अक्षय कुमारचा कोरिओग्राफर चिन्नी प्रकाशने फ्राइडे टॉकीज या यूट्यूब चॅनलवर खुलासा करत म्हणाला, "मी अक्षय सोबत 50 पेक्षा जास्त गाणी शूट केली आहेत. पण त्याच्यात कधीच बदल दिसला नाही. मी त्याच्यासोबत जेवढे काम केले तेव्हा त्याने कधीच आपल्या कामाशी बेईमानी केली नाही."
advertisement
"विचार करा अंडी मारल्यावर त्याचा वास खूप वेळ जात नाही. हे सोपे नव्हते. पण त्याने कधीच म्हटले नाही की, मला हे जमणार नाही किंवा मी करु शकत नाही. मी खिलाडी सिनेमाचे एक गाणे शूट करत होतो. त्या गाण्यामध्ये त्याच्यावर काही मुलींना अंडी फेकायची होती. त्या मुलींनी त्याच्यावर अंडी मारली. मला माहिती आहे तेव्हा त्याला खूप वेदना झाल्या असतील. त्या अंड्यांचा वासही लवकर जात नाही. पण अक्षयने शूट न थांबवता सगळा सीन पूर्ण केला."
advertisement
अक्षयचे केले कौतुक
तो पुढे अक्षयचे कौतुक करत म्हणाला, "तो एक सच्चा अभिनेता आहे. तो आपल्या प्रत्येक कामात आपले 100 टक्के देतो. त्याने मला कधीच साधी गाण्यातील एक स्टेपही बदलायला सांगितली नाही. तो 'डाउन टू अर्थ' अभिनेता आहे. मोहराचे जे गाणे होते 'तू चीज बडी है मस्त मस्त' त्यावेळी कोणाकडेच शूटींगच्या तारखा नव्हत्या. पण अक्षयने ते गाणे अर्ध्या झोपेत असताना पूर्ण केले. मी अक्षय सोबत 20 वर्षांनी जरी काम केले तरी मला त्याच्यात कोणताच बदल दिसणार नाही. त्याला जे काम दिले आहे ते तो पूर्ण करतोच."
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
अक्षय कुमारचं ते फेमस गाणं, ज्याच्या शूटींगवेळी मुलींनी 100 अंडी फेकून मारली, सेटवर नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement