प्रेग्नंसीत शूटींग, तिशीच्या आधी आई, तरी दिसते जशीच्या तशी, आलिया भट्ट इतकी फिट कशी?

Last Updated:

Alia Bhatt Diet Fitness : परफेक्ट फिगर असणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचं डाएट, वर्कआऊट आणि स्किनकेअर रुटीन काय आहे जाणून घ्या...

News18
News18
Alia Bhatt Fitness : बॉलिवूडच्या फिट आणि सौंदर्यवान अभिनेत्रींमध्ये आलिया भट्टचं नाव अग्रस्थानी आहे. हिंदी मनोरंजनसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी आलियाने चांगलच वजन कमी केलं होतं. तसेच गरोदरपणानंतरही तिने मोठ्या प्रमाणात वजन घटवलं. त्यामुळे आपली फिट बॉडी आणि ग्लोइंग स्किनमुळे अभिनेत्री कायम चर्चेत असते. आलिया भट्टचं नक्की डाएट काय? फिटनेस, स्किनकेअर रुटीन काय? अशा सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला या बातमीत मिळतील. आलिया भट्टचं हे डाएट, वर्कआऊट आणि स्किनकेअर रुटिन फॉलो करुन तुम्हीही फिट राहु शकता.
आलिया भट्टचा आहार काय? (Alia Bhatt Diet)
संतुलित आहार करण्यावर आलिया भट्टचा भर असतो. टोमॅटोची चटणी, भेंडीची भाजी, डाळ-भात, पोहे, ताक या पदार्थांचा आलियाच्या आहारात प्रामुख्याने समावेश असतो. फायबर आणि पोषक तत्तव असणाऱ्या गोष्टी तिला आवडतात. हॉलिवूडचे आहार विशेषज्ञ एंजी कसाबी यांचे सल्ले व्यायासंबंधीत सल्ले आलिया ऐकते. एंजी कसाबी आलियासोबत 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातही काम केलं आहे. आलियाच्या आहारात सर्व प्रकारच्या भाज्या, प्रोटीन आणि डिटॉक्स ड्रिंकचा समावेश असतोच.
advertisement
'असा' करते आलिया व्यायाम (Alia Bhatt Workout)
आलिया भट्ट आठवड्यातील सहा दिवस व्यायाम करते. सहनशक्ती वाढवण्यासाठी कार्डिओ, लवचिकता वाढवण्यासाठी पिलेट्स आणि योगा, आठवड्यातून चार दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग करते. अंशुकाकडून आलिया योग प्रशिक्षण घेते. कपोतासन योगप्रकार आलियाला आवडतो. त्यामुळे चाहत्यांनी या आसनाला आलिया पोज हे नाव दिलं आहे.
advertisement
त्वचेवर लक्ष देणारी आलिया!
आपला चेहरा चमकदार बनवण्यासाठी आलिया सर्वात पहिले एका माइल्ड सेटाफिल क्लींजरचा वापर करते. त्यानंतर टोनर म्हणून बायोमा फेशियल मिस्ट वापरते. या सर्व गोष्टी आलियाला हायड्रेटेड, चमकदार आणि तजेलदार ठेवतात.



 










View this post on Instagram























 

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)



advertisement
आलिया भट्टने रोमँटिक चित्रपटांपासून बायोपिकपर्यंत सर्वच ठिकाणी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. राझी, डियर जिंदगी, डार्लिंग्स, रॉकी और रानी की कहाणी, उडता पंजाब असे अभिनेत्रीचे अनेक चित्रपट गाजले आहेत. तिच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षकांना आता प्रतीक्षा आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
प्रेग्नंसीत शूटींग, तिशीच्या आधी आई, तरी दिसते जशीच्या तशी, आलिया भट्ट इतकी फिट कशी?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement