पप्पा रणबीरसोबत राहाची मस्ती, बाप-लेकीचं प्रेम पाहून भारावली आलिया, शेअर केला 2026 चा पहिला फॅमिली फोटो
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Alia-Raha-Ranbir Kapoor: रणबीर-आलिया यांनी नवीन वर्षातला पहिला आणि अत्यंत गोंडस फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मुंबई: कपूर खानदानाची लाडकी लेक राहा कपूर आणि तिचे लाडके आई-बाबा म्हणजेच रणबीर-आलिया यांनी नुकतंच त्यांच्या न्यू इअर ट्रीपमधील काही फोटो त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केले. २०२६ च्या स्वागतासाठी हे पॉवर कपल वेकेशनवर गेलं होतं. अशातच आलियाने नवीन वर्षातला पहिला आणि अत्यंत गोंडस फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
रणबीर-राहाचा क्यूट फादर-डॉटर फोटो
आलियाने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये आनंदाचा जणू कारंजाच फुटला आहे. पांढऱ्याशुभ्र कपड्यांमध्ये ट्विनिंग करत असलेलं हे कुटुंब एका बीचवर असल्याचं दिसतंय. फोटोमध्ये रणबीर कपूर आपली चिमुकली राहा हिला आनंदाने हवेत उंच उडवताना दिसतोय, तर बाजूला उभी असलेली आलिया हा आनंद तिच्या डोळ्यांनी अनुभवत आहे.
advertisement
आलियाच्या हातात एक छोटी छडी दिसत असून, तिने या फोटोला अतिशय अर्थपूर्ण कॅप्शन दिलं आहे. ती म्हणते, "& up you go love.. happy 2026". म्हणजे माझ्या प्रेमा, तू अशीच प्रगती करत उंच भरारी घे... या एका ओळीतून आलियाने लेकीवरचं प्रेम आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा अशा दोन्ही गोष्टी व्यक्त केल्या आहेत.
advertisement
advertisement
लाईक्सचा पाऊस आणि सेलिब्रिटींच्या कमेंट्स
हा फोटो पोस्ट होताच काही मिनिटांतच सोशल मीडियावर लाईक्सचा महापूर आला. अवघ्या काही तासांत ८ लाखांहून अधिक लोकांनी या फोटोला पसंती दिली आहे. केवळ चाहतेच नाही, तर सामंथा रुथ प्रभू, तृप्ति डिमरी, दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा आणि ओरी यांसारख्या बड्या सेलिब्रिटींनीही या हॅपी फॅमिलीवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
advertisement
२०२६ मध्ये रणबीर-आलियाचा धमाका
एकीकडे फॅमिली लाईफ एन्जॉय करत असतानाच, हे दोघंही कामाच्या आघाडीवर मोठे बॉम्ब फोडायला तयार आहेत. आलिया भट्ट लवकरच यशराज फिल्म्सच्या 'अल्फा' (Alpha) या पहिल्या फिमेल स्पाई थ्रिलरमध्ये शरवरी वाघसोबत ॲक्शन मोडमध्ये दिसेल. तसेच संजय लीला भंसाळींच्या 'लव अँड वॉर' मध्ये ती रणबीर आणि विकी कौशलसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
advertisement
रणबीरसाठी २०२६ हे वर्ष ऐतिहासिक ठरणार आहे. नितेश तिवारींच्या 'रामायण' मध्ये तो प्रभू श्रीरामांची भूमिका साकारताना दिसेल. शिवाय, सर्वांना वेड लावणाऱ्या 'एनिमल'चा पुढचा भाग म्हणजेच 'एनिमल २' ची ही तयारी जोरात सुरू आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 04, 2026 4:49 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
पप्पा रणबीरसोबत राहाची मस्ती, बाप-लेकीचं प्रेम पाहून भारावली आलिया, शेअर केला 2026 चा पहिला फॅमिली फोटो











