अमिताभनी रिजेक्ट केलेल्या त्या फिल्ममुळे बनलं अनिल कपूरचं करिअर, आजही आवडीने पाहतात लोक
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
Anil Kapoor - Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी रिजेक्ट केलेल्या सिनेमाने अनिल कपूरचे करियर झालं. आजही सगळ्यांचा आवडता सिनेमा आहे.
Anil Amitabh : अमिताभ बच्चन आणि अनिल कपूर दोघेही बॅालिवूडचे स्टार अभिनेते आहेत. कित्येक वर्ष ते हिंदी सिनेसृष्टीत काम करत आहेत. दोघांनीही आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. तुम्हाला माहीती आहे का अनिल कपूर अगोदर सिनेमात काम करत होता, पण त्याला म्हणण्यासारखं नाव मिळाले नाही. त्यानंतर असा एक सिनेमा त्याच्या पदरात पडला आणि तो हिट झाला. अनिल कपूर चांगला अभिनेता म्हणून प्रसिद्ध झाला. एक सिनेमा होता ज्यात अमिताभ काम करणार होते पण तो सिनेमा अनिल कपूरला मिळाला आणि त्याचं नशीबच बदललं.
अमिताभना केले रीप्लेस
'मेरी जंग' असं सिनेमाचं नाव आहे. आधी या सिनेमाचं नाव सतरंग ठेवण्यात आलं होतं. त्यात अमिताभ लीड करणार होते. जया प्रदा नायिका होत्या. अमरीश पुरी खलनायक होते. त्यांचा मुलगा अनिल कपूर दाखवार होते. त्याच वेळेस अमिताभ यांची तब्येत ठीक नव्हती. ते राजकारणातही प्रवेश करणार होते त्यामुळे त्यांनी हा सिनेमा नाकारला. अमिताभ यांनी सिनेमा सोडल्याने जया प्रदा यांनीही हा सिनेमा सोडला.
advertisement
सिनेमाचे नाव बदलले
एनएल सिप्पीने या सिनेमाच्या दिग्दर्शनासाठी जबाबदारी सुभाष घई यांच्याकडे सोपवली होती. स्क्रीप्टवरती काम सुरु झाले. या सिनेमाचे नाव बदलून 'मेरी जंग' ठेवण्यात आले. नव्या हीरोसाठी पहील्यांदा शत्रुघ्न सिन्हा यांना विचारले असता त्यांनी नकार दिला. सुभाष घई यांनी अनिलला मशाल सिनेमात पाहिले होते. ते त्याच्या अभिनयावर खूप खूश झाले होते. त्यांनी अनिल कपूरला डायरेक्ट हीरो करुन टाकले.
advertisement
अनिल कपूरचे करियर
view commentsअनिल कपूर म्हणाला, "अमिताभ यांनी या सिनेमाला नकार दिला नसता तर मला ही संधी मिळाली नसती" त्यानंतर खरंच अनिल कपूरचे करिअर बदलले. त्या सिनेमातील कोर्टरुम मधील सीन ,संवाद फेक, भावनिकता याने सगळ्यांचे मन जिंकले होते. अनिल कपूरच्या करियर मधील एक दिशा देणारा सिनेमा होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 21, 2025 6:06 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
अमिताभनी रिजेक्ट केलेल्या त्या फिल्ममुळे बनलं अनिल कपूरचं करिअर, आजही आवडीने पाहतात लोक