12 बॉल 12 रनची गरज, हातात 6 विकेट, त्यानंतर आला ट्विस्ट, क्रिकेट विश्वातला धक्कादायक निकाल!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
विजयासाठी 12 बॉलमध्ये 12 रनची गरज होती आणि हातात 6 विकेट होत्या, तरीही बॅटिंग टीमने हा सामना गमावला आहे. या निकालाकडे क्रिकेट विश्वातला सगळ्यात धक्कादायक निकाल म्हणून पाहिलं जात आहे.
नवी मुंबई : महिला वर्ल्ड कपमधल्या सगळ्यात धक्कादायक निकालाचा अनुभव क्रिकेट रसिकांनी घेतला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात बांगलादेशला विजयासाठी 12 बॉलमध्ये 12 रनची गरज होती आणि त्यांच्या हातात 6 विकेट होत्या, तरीही बांगलादेशने हा सामना 7 रननी गमावला आहे. बांगलादेश-श्रीलंकेतल्या या सामन्याच्या निकालावर अनेकांना धक्का बसला आहे.
श्रीलंकेने दिलेल्या 203 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला 50 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 195 रन करता आल्या. 193 रनवर बांगलादेशची पाचवी विकेट गेली, तेव्हा त्यांना विजयासाठी फक्त 10 रन हव्या होत्या, पण यानंतर त्यांची बॅटिंग गडगडली. रेबिया खान 1 रनवर, नाहिदा अख्तर आणि मरुफा अख्तर शून्य रनवर आऊट झाल्या, तर निशिता निशी 1 रनवर आणि शर्मिन अख्तर 64 रनवर नाबाद राहिली.
advertisement
श्रीलंकेकडून कर्णधार चामारी अटापटूने 4 विकेट घेतल्या तर सुगंदिका कुमारीला 2 आणि प्रबोधिनीला 1 विकेट मिळाली. या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर त्यांचा 202 रनवर ऑलआऊट झाला. हासिनी परेराने सर्वाधिक 85 रन केले, तर चामारी अटापटूने 46 रनची खेळी केली. बांगलादेशकडून शोर्ना अख्तरला 3 आणि राबिया खानला 2 विकेट मिळाल्या. मरुफा अख्तर, निशी, नाहिदा अख्तर यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं. या पराभवासोबतच बांगलादेशचं वर्ल्ड कप सेमी फायनलला पोहोचण्याचं स्वप्न भंगलं आहे, तर श्रीलंकेचा विजय होऊनही त्यांचं सेमी फायनलला पोहोचणंही अशक्यच आहे.
Location :
Navi Mumbai,Thane,Maharashtra
First Published :
October 20, 2025 11:50 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
12 बॉल 12 रनची गरज, हातात 6 विकेट, त्यानंतर आला ट्विस्ट, क्रिकेट विश्वातला धक्कादायक निकाल!