क्रिकेट इतिहासतला सगळ्यात विचित्र आऊट, बोल्ड का स्टम्पिंग? Video पाहून तुम्हीच सांगा!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
श्रीलंकेची ऑलराऊंडर कविशा दिलहारीला क्रिकेट इतिहासातल्या सगळ्यात धक्कादायक विकेटला सामोरं जावं लागलं आहे.
मुंबई : श्रीलंकेची ऑलराऊंडर कविशा दिलहारीला क्रिकेट इतिहासातल्या सगळ्यात धक्कादायक विकेटला सामोरं जावं लागलं आहे. महिला वर्ल्ड कपच्या सामन्यात ही घटना घडली आहे. विरोधी बांगलादेशच्या खेळाडूंनाही दिलहारी आऊट झाली हे कळालं नाही, शेवटी अंपायरने ती आऊट झाल्याचं स्पष्ट केलं.
श्रीलंका-बांगलादेश यांच्यातल्या सामन्यात 20व्या ओव्हरमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या. बांगलादेशची स्पिनर नाहिदा अक्तरने ऑफ स्टंपच्या बाहेर स्लायडर टाकला, यावर दिलहारीने उशीरा कट मारला आणि सगळा गोंधळ सुरू झाला.
यानंतर स्टंपिंग पाहण्यासाठी निर्णय थर्ड अंपायरकडे पाठवण्यात आला आणि सामन्यात ट्विस्ट आला. तेव्हाही बांगलादेशच्या खेळाडूंना दिलहारी आऊट झाली आहे, ते समजलं नाही. बॉल स्टंपवर आदळला, तेव्हा दिलहारीचा पाय हवेत होता आणि बेल्स आधीच पडल्या होत्या, त्यामुळे थर्ड अंपायरने तिला आऊट दिलं. बांगलादेशच्या खेळाडूंना काय घडलं? याचा पत्ताही लागला नाही, तेव्हा थर्ड अंपायरने आऊटचा निर्णय दिला.
advertisement
See it to believe it
Off the wicket-keeper’s pads and onto the stumps
Watch #CWC25 action LIVE, broadcast details https://t.co/7wsR28PFHI pic.twitter.com/Zuxbj9zoC3
— ICC (@ICC) October 20, 2025
थर्ड अंपायरने आऊट दिल्यानंतर दिलहारी अंपायरकडे गेली आणि नेमकं काय घडलं? हे समजून घ्यायचा प्रयत्न तिने केला. श्रीलंकेची टीम 270-280 पर्यंत पोहोचेल, असं वाटत होतं, पण त्यांनी शेवटच्या 6 विकेट फक्त 28 रनवर गमावल्या. हसिनी परेराने सर्वाधिक 85 रन केल्या, हा तिच्या करिअरमधील सर्वोत्तम स्कोअर आहे. तर कर्णधार चामारी अटापटूने 46 आणि निलक्षिका सिल्वाने 37 रन केले. बांगलादेशच्या शोर्ना अक्तरने 10 ओव्हरमध्ये 4 मेडन टाकत 27 रन दिल्या आणि 4 विकेट घेतल्या, यामुळे श्रीलंकेचा 202 रनवर ऑलआऊट झाला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 20, 2025 11:28 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
क्रिकेट इतिहासतला सगळ्यात विचित्र आऊट, बोल्ड का स्टम्पिंग? Video पाहून तुम्हीच सांगा!