Jalgaun News : ऐन दिवाळीत जळगावमध्ये दोन गटात दगडफेक, परिसरात तणावाचे वातावरण,नेमकं काय घडलं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
राज्यभरात दिवाळीचा उत्साह आहे, या दरम्यान जळगाव जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जळगाव जिह्यातील चाळीसगाव मध्ये दोन गटात दगडफेक झाल्याची घटना घडली आहे.
Jalgaun News : विजय वाघमारे, जळगाव, चाळीसगाव : राज्यभरात दिवाळीचा उत्साह आहे, या दरम्यान जळगाव जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जळगाव जिह्यातील चाळीसगाव मध्ये दोन गटात दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. या दगडफेकीनंतर काही गाड्यांची ही तोडफोड झाल्याची घटना घडली आहे.चाळीसगाव शहरातील नागद रोड परिसरातील घटना घडली आहे. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतत तत्काळ घटनास्थळी पोलिसांनी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. पण नेमकी दोन गटात दगडफेक का झाली? या दगडफेकी मागचं कारण काय होतं? हे जाणून घेऊयात.
advertisement
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे एका गाडीला कट लागल्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला होता. सूरूवातीला शाब्दीक वाद सूरू झाला.त्यानंतर दोन्ही गटाकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली होती. या दगडफेकीनंतर काही गाड्यांची तोडफोडही करण्यात आल्याची घटना घडली आहे. चाळीसगाव शहरातील नागद रोड परिसरातील घटना घडली होती. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
advertisement
दिवाळीत ही घटना घडल्याने एकच खळबळ माजली होती.त्यानंतर घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थितीवर नियंत्रणात आणली आहे. चाळीसगाव शहरात तणावपूर्ण शांतता आहे.तसेच घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचसोबत नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहन केले आहे.
advertisement
दरम्यान या घटनेत आतापर्यंत पोलिसांनी कुणाला अटक केली आहे का? तसेच दगडफेक करणारे कोण लोक होती?याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही?तसेच ज्या गाडीला कट मारला होता? ती गाडी कुणाची आहे? याची देखील माहिती मिळू शकलेली नाही आहे.पण या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहेत.
advertisement
Location :
Jalgaon,Jalgaon,Maharashtra
First Published :
October 20, 2025 11:45 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalgaun News : ऐन दिवाळीत जळगावमध्ये दोन गटात दगडफेक, परिसरात तणावाचे वातावरण,नेमकं काय घडलं?