आधी म्हणाले 'मी भाजप आणि मोदींचा भक्त'; आता महेश कोठारेंकडून एकनाथ शिंदे यांची तारीफ, 'भाई जे करतात ते...'

Last Updated:

Dharmaveer Anand Dighe Natya Mandir : अंबरनाथमध्ये धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिराचे उद्घाटन महेश कोठारे, अशोक सराफ यांच्या उपस्थितीत उत्साहात झाले. यावेळी या दिग्गजांनी एकनाथ शिंदेंच्या कार्याचे कौतुक केले.

News18
News18
मुंबई : अंबरनाथ शहराला आता एक नवा सांस्कृतिक ठेवा मिळाला आहे! 'धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिरा'चे भव्य उद्घाटन नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले. या सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीचे दोन आधारस्तंभ, अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी या दिग्गजांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कामाचे तोंड भरून कौतुक केले.

महेश कोठारेंनी धडाकेबाज स्टाइलने केलं कौतुक

'धडाकेबाज' दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठारे यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या कामाच्या शैलीची प्रशंसा करत केली. कोठारे म्हणाले, "धडाकेबाज आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि झपाटलेले खासदार श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथकरांना खरोखरच एक 'रत्न' भेट दिलं आहे. या शहराला नाट्यकलेचं इतकं भव्य स्थान मिळालं, याबद्दल आम्ही सगळे कलाकार खूप खूश आहोत."
advertisement
त्यांनी यावेळी अमेरिकेतील एका खास आठवणीला उजाळा दिला. "मी अमेरिकेतील 'टाईम्स स्क्वेअर' परिसरातील 'लिरिक्स थिएटर'मध्ये 'हॅरी पॉटर'चा शो पाहिला. तिथल्या नाट्यगृहात त्यांच्या कलाकारांचे पोट्रेट लावले होते. तसंच काहीसं दृश्य मला इथेही पाहून खूप आनंद झाला. कलाकाराला असं स्थान देणं, ही खूप मोठी गोष्ट आहे. शिंदे साहेब जे काही करतात, ते 'धडाकेबाजच' करतात! असा उद्घाटन समारंभ मी कधीच पाहिलेला नव्हता."
advertisement

अशोक सराफ यांनीही गायली स्तुतीसुमने

मराठी रंगभूमीचे लाडके कलाकार अशोक सराफ यांनी त्यांच्या खास विनोदी शैलीत प्रेक्षकांशी संवाद साधला. त्यांनी या नाट्यमंदिराला 'या शहराची शान' असे म्हटले. ते म्हणाले, "अंबरनाथचं हे नाट्यमंदिर म्हणजे या शहराची शान आहे. जसं तुम्हाला शिवमंदिराबद्दल आदर आहे, तसाच या नाट्यमंदिराबद्दलही आदर ठेवा. महाराष्ट्रात इतकं भव्य नाट्यमंदिर दुर्मिळ आहे."
advertisement
त्यांनी नाट्यगृहाच्या स्वच्छतेवर विशेष भर दिला. "इतर ठिकाणी नाट्यगृहांमध्ये स्वच्छतेचा प्रश्न असतोच, पण मला खात्री आहे की अंबरनाथचे सुसंस्कृत आणि कलाप्रेमी नागरिक हे नाट्यमंदिर स्वच्छ ठेवतील. हे आपलं घर आहे, त्याची काळजी आपणच घ्यायची."
अशोक सराफ यांनी मराठी भाषेतील अनुस्वाराचे महत्त्व सांगताना एक गमतीशीर उदाहरण दिले, "अनुस्वार हा जणू गंधासारखा आहे. तो नीट दिला नाही, तर शब्दाचा अर्थच बदलतो. 'रग' वर अनुस्वार दिला की 'रंग' होतो!" शेवटी त्यांनी एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक वेळी दिलेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
आधी म्हणाले 'मी भाजप आणि मोदींचा भक्त'; आता महेश कोठारेंकडून एकनाथ शिंदे यांची तारीफ, 'भाई जे करतात ते...'
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement