नितीन देसाईंच्या ND Studioमध्ये पुन्हा लाइट, कॅमेरा, अॅक्शन! सरकारने घेतला ताबा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
ND studio nitin desai : नितीन देसाई यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या एनडी स्टुडिओचं पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. एनडी स्टुडिओमध्ये आता पुन्हा एकदा लाईट्स, साऊंड, कॅमेरा, अॅक्शनचा आवाज घुमणार आहे.
मुंबई : दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचा 2 ऑगस्ट 2023 रोजी मृत्यू झाला. त्यांनी त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येनं संपूर्ण इंडस्ट्री हळहळली. नितीन देसाई यांच्या मृत्यूनंतर त्यांचा भव्य दिव्य 52 एकरात वसलेला एनडी स्टुडिओ देखील बंद पडला. एनडी स्टुडिओचं पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. एनडी स्टुडिओमध्ये आता पुन्हा एकदा लाईट्स, साऊंड, कॅमेरा, अॅक्शनचा आवाज घुमणार आहे. कारण नितीन देसाई यांचा एनडी स्टुडिओ राज्य सरकाराने ताब्यात घेतला आहे.
नितीन देसाई यांचा कर्जतमधील एनडी स्टुडिओ महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने चालवण्यासाठी ताब्यात घेतला आहे. एनडी स्टुडिओचे परिचालन व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.
स्टुडिओचे दैनंदिन प्रशासन, सुरक्षा, चित्रीकरण, महसूल व लेखाजोखा यावर महापालिकेचे नियंत्रण असणार आहे. व्यवस्थापकीय संचालकांच्या देखरेखीखाली एक विशेष टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. हा टास्क फोर्स स्टुडिओमध्ये चालू असलेल्या प्रशासकीय आणि विकास कामांमध्ये समतोल ठेवणार आहे. इतर व्यावसायिकांव्यतिरिक्त, टीममध्ये वित्त, कायदा, आयटी, एचआर सारखे डिपार्टमेंट असून त्यातील तज्ञ लोक असणार आहेत. सध्या म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सावळकर व विशेष कार्यकारी अधिकारी संजय कृष्णाजी पाटील प्रशासकीय कामकाज पाहणार आहेत.
advertisement
'लगान', 'जोधा अकबर' यांसारख्या अनेक बॉलिवूड सिनेमे एनडी स्टुडिओमध्ये शुट झाले आहेत. नितीन देसाईंच्या एनडी स्टुडिओमध्ये एकदा तरी काम करण्याची संधी मिळावी अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असायची. नितीन देसाई यांचे अनेक कलाकारांशी जिव्हाळ्याचं नातं होतं. त्यांच्या जाण्यानं इंडस्ट्रीत निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी आहे. पण आता त्यांचा एनडी स्टुडिओ मात्र पुन्हा एकदा चमकताना दिसणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 29, 2024 8:53 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
नितीन देसाईंच्या ND Studioमध्ये पुन्हा लाइट, कॅमेरा, अॅक्शन! सरकारने घेतला ताबा








