advertisement

Nitin Desai Death: नितीन देसाईंनी सलमान खानसाठी बनवला होता 1 कोटींचा काचेचा महाल

Last Updated:

मनोरंजन सृष्टीतून एक खळबळजक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं.

News18
News18
मुंबई, 02 ऑगस्ट :  मनोरंजन सृष्टीतून एक खळबळजक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. त्यांनी वयाच्या 58 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. एनडी स्टुडिओत गळफास घेत त्यांनी हे टोकाचं पाऊस उचललं. यामुळे बॉलिवूड तसेच मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्काच बसला आहे. नितीन देसाई यांनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
नितीन देसाई हे कला क्षेत्रातलं खूप मोठं नाव. ते चित्रपट कला दिग्दर्शक आणि निर्माते होते. मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी अनेक वर्ष काम केलं. त्यांचा एक भव्य स्टुडिओही होता. 43 एकरात पसरलेल्या त्यांच्या या स्टुडीओचं नाव होतं एनडी स्टुडिओ. 2005 मध्ये त्यांनी मुंबईजवळील कर्जत येथे 43 एकरात भव्य असा एनडी स्टुडिओ उभारला होता. ज्यात अनेक प्रसिद्ध चित्रपटांचं शुटिंग झालं. 'हरिश्चंद्राची फॅक्ट्री' या सिनेमासाठी त्यांना उत्कृष्ट कला दिग्दर्शक महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्काराने गौरविण्यात आले होते. हम दिल दे चुके सनम आणि देवदास साठी या चित्रपटांसाठी त्यांना उत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
advertisement
ऐश्वर्या राय, सलमान खान, अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा, आमिर खान अनेक मोठ मोठ्या स्टार, सुपरस्टारसोबत त्यांनी काम केलं आणि आपली एक वेगळी अशी छाप सोडली. नितीन देसाई यांनी सलमानसाठी चक्क 1 कोटींचा चष्म्यांचा काचेचा महालही बनवला होता. प्रेम रतन धन पायोसाठी त्यांनी हा सेट बनवला होता. या चित्रपटासाठी सलमान 90 दिवस सेटवर राहिला होता.
advertisement
नितीन देसाई यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात 1987 साली टीव्हीशोमधून केली होती. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलंच नाही. प्रसिद्धीच्या उंच शिखरावर पोहोचलेल्या नितीन देसाईनं असं टोकाचं पाऊस का उचललं असावं? असा प्रश्न सध्या सर्वांना पडला आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Nitin Desai Death: नितीन देसाईंनी सलमान खानसाठी बनवला होता 1 कोटींचा काचेचा महाल
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement