advertisement

आजवर कधीच न पाहिलेल्या भूमिकेत दिसणार अशोक सराफ; 'या' दिवशी रिलीज होणार नवा सिनेमा

Last Updated:

आजवर कधीच न पाहिलेली अशोक सराफ यांची भूमिका त्यांच्या नव्या सिनेमात पाहायला मिळणार आहे. नुकतंच सिनेमाचं पोस्टर आणि रिलीज डेट सांगण्यात आली आहे. 

अशोक सराफ यांचा नवीन सिनेमा
अशोक सराफ यांचा नवीन सिनेमा
मुंबई : महाराष्ट्र भूषण, मराठी इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ आजही अभिनय क्षेत्रात सक्रीय आहेत. वयाच्या 77 व्या वर्षी नाटक आणि सिनेमा अशा दोन्ही माध्यमात अशोक सराफ काम करत आहेत. आजही ते तितक्याच ताकदीनं अभिनय करतात आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. कलाकारांना वयाचं बंधन नसतात असं म्हणतात. अशोक सराफ यांच्याबाबतीतही असंच काही घडलं आहे. आजवर कधीच न पाहिलेली अशोक सराफ यांची भूमिका त्यांच्या नव्या सिनेमात पाहायला मिळणार आहे. नुकतंच सिनेमाचं पोस्टर आणि रिलीज डेट सांगण्यात आली आहे.
विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे,  2 ऑगस्टला सिनेमा रिलीज होतोय. या सिनेमात अशोक सराफ यांच्याबरोबर अभिनेते माधव अभ्यंकर प्रमुख भूमिकेत आहेत. त्याचबरोबर हेमांगी कवी, भरत दाभोळकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत.
advertisement
सिनेमाबद्दल आणखी सांगायचं झाल्यास,  आधुनिक विज्ञान आणि जुन्या रितीरिवाजांमधील संघर्ष यावर हा सिनेमा आधारित आहे.  पोस्टरमध्ये  अशोक सराफ यांच्या गळ्यातील स्टेथोस्कोप आणि माधव अभ्यंकर यांच्या गळ्यातील तुळशीमाळ यावरून या दोघांमधील मतभेदाचा अंदाज प्रेक्षकांना येऊ शकतो. मात्र हा मतभेद कोणत्या कारणावरून आहे, याचे उत्तर प्रेक्षकांना सिनेमा पाहिल्यावरच मिळणार आहे. वयाच्या 77व्या वर्षी अशोक सराफ डॉक्टरांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
advertisement
'लाईफ लाईन' या सिनेमाला 11 आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.  'लाईफ लाईन' चे तरुण दिग्दर्शक साहिल शिरवईकर यांनी सांगितलं, "अतिशय नाजूक विषय असल्यामुळे अतिशय संवेदनशीलरित्या आम्ही तो मांडला आहे. विज्ञान आणि जुन्या परंपरा यात नेहमीच तफावत राहिलेली आहे. प्रत्येकाची विचारसरणी बदलणारा 'लाईफ लाईन' आहे. कथानक, कलाकार या सगळ्याच जमेच्या बाजू असल्याने मला खात्री आहे, हा सिनेमा नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.''
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
आजवर कधीच न पाहिलेल्या भूमिकेत दिसणार अशोक सराफ; 'या' दिवशी रिलीज होणार नवा सिनेमा
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement