Singer Death : संध्याकाळी होणार होता Live Show, त्याआधीच पाण्यात बुडून प्रसिद्ध गायकाचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Singer Death : संध्याकाळी ज्या ठिकाणी गाण्याच्या शो होणार होता तिथेच काही तास आधी प्रसिद्ध गायकाचा मृत्यू झाला. पाण्यात बुडून त्याचा जीव गेला.
मुंबई : मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका प्रसिद्ध गायकाचा मृत्यू झालाय. वयाच्या 52 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. गायकाच्या निधनाच्या बातमीनं सर्वत्र शोककळा पसरली आहे. या अपघातात म्हत्त्वाचं म्हणजे जिथे मृत्यू झाला तिथेच त्याच्या गाण्याचा शो होता. मात्र शोच्या काही तास आधीच त्याचा मृत्यू झाला. गायकाच्या मृत्यूचं कारण अत्यंत धक्कादायक आहे.
जुबिन गर्ग असं गायकाचं नाव असून तो आसामचा प्रसिद्ध गायक आहे. जुबिन सिंगापूरमध्ये गेला होता. तिथे स्कुबा डायव्हिंगचा आनंद घेत असताना पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. जुबिन सिंगापूरमध्ये एका खासगी बीचवर डायव्हिंग करत असताना त्याचा अपघात झाला. स्कुबा डायव्हिंग करत असताना जुबिन अचानक पाण्यात बेशुद्ध पडला. तो बेशुद्ध झालाय आणि बुडतोय हे दिसल्यानंतर त्याला पाण्यातून बाहेर काढण्यात आलं.
advertisement
( शूटींगदरम्यान अचानक बेशुद्ध, रुग्णालयात पोहोचताच प्रसिद्ध कॉमेडियनचा मृत्यू; सिनेसृष्टीवर शोककळा )
सिंगापूर पोलिसांनी दिली मदत
अपघातानंतर जुबिन गर्गला सिंगापूर पोलिसांनी पाण्यातून बाहेर काढलं. त्याला तात्काळ जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. गायकावर ICU मध्ये उपचार सुरू होते. डॉक्टर त्याच्यावर सतत लक्ष ठेवून होते. मात्र उपचारांती गायकाचा मृत्यू झाल्याची माहिती आली आहे.
advertisement
दरम्यान गायक जुबिन गर्गच्या प्रकृतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून किंवा अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली नाही. हॉस्पिटल प्रशासनानेही अद्याप अधिकृत निवेदन दिलेलं नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये गोंधळ आणि चिंतेचं वातावरण आहे.
North East Festival साठी गेला होता सिंगापूरला
गायक जुबिन गर्ग सिंगापूरमध्ये North East Festival मध्ये परफॉर्म करणार होता. हा कार्यक्रम आज होणार होता. मात्र कार्यक्रमाच्या आदल्या दिवशीच हा दुर्दैवी अपघात झाला. त्यांच्या जाण्यानं फक्त आसामच नव्हे तर संपूर्ण भारतात धक्का बसला आहे. जुबिन गर्गने केवळ गायकच नव्हते तर संगीतकार, अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. त्यांच्या अचानक जाण्यानं चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर लोकांनी श्रद्धांजली वाहायला सुरुवात केली आहे.
advertisement
जुबिन गर्ग यांनी आसामी तसेच हिंदी आणि इतर भाषांमधील गाणी गाऊन लोकप्रियता मिळवली. त्यांनी चित्रपटसृष्टीत महत्त्वाचं योगदान दिलं आहे. त्यांचा आवाज आणि संगीत आजही लाखो चाहत्यांच्या मनात जिवंत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 19, 2025 4:16 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Singer Death : संध्याकाळी होणार होता Live Show, त्याआधीच पाण्यात बुडून प्रसिद्ध गायकाचा मृत्यू; नेमकं घडलं काय?