Allu Arjun : मोठा राडा, 'पुष्पा 2' फेम अल्लू अर्जुनच्या घरात घुसून जमावाने केली तोडफोड, VIDEO आला समोर

Last Updated:

Allu Arjun's House Vandalised: एका जमावाने अल्लू अर्जुनच्या हैदराबाद येथील घरात घुसून त्याच्या मालमत्तेची तोडफोड केली आहे. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे.

एका जमावाने अल्लू अर्जुनच्या हैदराबाद येथील घरात घुसून त्याच्या मालमत्तेची तोडफोड केली आहे. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे.
एका जमावाने अल्लू अर्जुनच्या हैदराबाद येथील घरात घुसून त्याच्या मालमत्तेची तोडफोड केली आहे. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे.
पुष्पा २ ने जगभरात खळबळ माजवली आहे. या सिनेमाने अनेक रेकॉर्ड्स मोडले आणि नवे रेकॉर्ड्स बनवलेही आहे. मात्र अल्लू अर्जुनच्या या यशाला गालबोट लागलं. ‘पुष्पा 2’ च्या स्क्रीनिंग दरम्यान हैदराबादच्या संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरी आणि त्यात एका महिलेचा झालेला मृत्यू या प्रकरणी अल्लू अर्जुनवर कारवाई करण्यात आली. हैदराबाद पोलिसांनी सुपरस्टार अल्लू अर्जुनला अटक केली. त्यानंतर त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र त्याच दिवशी त्याला जामीनही मंजूर झाला.
मृत्यू झालेल्या महिलेचा मुलालाही यावेळी गंभीर दुखापत झाली होती. तो सध्या व्हेंटिलेटरवर आहे. या प्रकरणी अल्लू अर्जुनने सहानुभूती दर्शवत त्या कुटुंबाला लागेल ती मदत करण्याचे आश्वासनही दिले. मात्र हे प्रकरण दिवसेंदिवस चिघळताना दिसते आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर एका जमावाने अल्लू अर्जुनच्या हैदराबाद येथील घरात घुसून त्याच्या मालमत्तेची तोडफोड केली आहे. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे.
advertisement
एका टोळीने त्याच्या घरात घुसून त्याच्या मालमत्तेची नासधूस केली आहे. हे लोक उस्मानिया विद्यापीठाचे सदस्य असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पोलिसांनी हस्तक्षेप करून जेएसीच्या आठ सदस्यांना अटक केली, ज्यांना नंतर ज्युबली हिल्स पोलिस ठाण्यात नेण्यात आले.
advertisement
उस्मानिया युनिव्हर्सिटी जेएसीच्या अनेक सदस्यांचा समावेश असलेल्या या गटाने अभिनेत्याच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि 4 डिसेंबर रोजी एका सिनेमात चेंगराचेंगरी सारख्या परिस्थितीत मृत्यू झालेल्या 35 वर्षीय महिलेच्या कुटुंबाला एक कोटींची भरपाई देण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणी आता अल्लू अर्जुन काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Allu Arjun : मोठा राडा, 'पुष्पा 2' फेम अल्लू अर्जुनच्या घरात घुसून जमावाने केली तोडफोड, VIDEO आला समोर
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement