सुशांतला अनुष्काबरोबर किस करताना पाहून भडकली होती अंकिता; म्हणाली, मी नखांनी त्याला...
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अंकिता लोखंडे सुशांत सिंहविषयी बोलताना दिसली. सुशांतच्या शुद्ध देसी रोमान्स या सिनेमातील त्याच्या आणि अनुष्का शर्माच्या किसिंग सीन विषयी तिनं खुलासा केला.
मुंबई, 26 डिसेंबर : बिग बॉस 17मध्ये दरदिवशी एक नवीन ड्रामा पाहायला मिळत असतो. अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा घराबाहेर झाल्यानंतर पुन्हा एकदा अंकिता लोखंडे आणि विक्की जैनचा नवा ड्रामा पहायला मिळतोय. बिग बॉसच्या घरात आजवर दोघेही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे करत आले आहेत. अंकितानं सुशांत विषयी देखील अनेक माहिती नसलेल्या गोष्टी प्रेक्षकांसमोर आणल्या. दरम्यान पुन्हा एकदा अंकिता लोखंडे सुशांत सिंहविषयी बोलताना दिसली. सुशांतच्या शुद्ध देसी रोमान्स या सिनेमातील त्याच्या आणि अनुष्का शर्माच्या किसिंग सीन विषयी तिनं खुलासा केला.
बिग बॉसच्या नव्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे की अंकिता पुन्हा एकदा सुशांतची आठवण काढते. सुशांतनं पीके सिनेमात पहिल्यांदा ऑनस्क्रिन किस केलं होतं. त्यानंतर शुद्ध देसी रोमान्स या सिनेमावेळी त्यानं एक थिएटर फक्त अंकितासाठी बुक केलं होतं. कारण या सिनेमात त्यानं काही इंटिमेट सीन्स दिले होते.
advertisement
अंकितानं पीके सिनेमात अनुष्का शर्मा आणि सुशांतच्या किसिंगवर प्रतिक्रिया देत म्हटलं, 'जेव्हा मी पीके सिनेमा पाहिला तेव्हा मला चक्कर आली होती. त्यानंतर शुद्ध देसी रोमान्स सिनेमातील सुशांतचा इंटिमेट सीनवर अंकिता म्हणाली, सुशांतला दुसऱ्या मुलीबरोबर किस करताना पाहून माझं मन तुटलं होतं.'
अंकिता पुढे म्हणाली, 'आम्ही सिनेमा पाहायला गेलो. सुशांतनं यशराज स्टुडिओचा संपूर्ण थिएटर हॉल बुक केला होता. तिथे माझ्या आणि सुशांतशिवाय कोणीही नव्हतं. सुशांत हा सिनेमा इतर कोणाबरोबरच पाहू शकत नव्हता कारण त्याला माहिती होतं की तो मला गमावून बसेल. पूर्ण सिनेमा पाहताना मी माझ्या नखांनी सुशांतला ओरबटलं होतं.'
advertisement
अंकिता पुढे म्हणाली, 'तो तेव्हा तिथून निघून गेला. मी संपूर्ण सिनेमा पाहिला आणि सगळे सीन पाहून घरी जाऊन खूप रडले. सुशांत देखील खूप रडला होता. मला माफ कर बुबू पुन्हा असं करणार नाही, असं म्हणत त्यानं माझी माफी मागितली होती.'
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 26, 2023 11:52 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
सुशांतला अनुष्काबरोबर किस करताना पाहून भडकली होती अंकिता; म्हणाली, मी नखांनी त्याला...