'त्याचे अनेक अफेअर्स... मुलींची फसवणूक करण्याची सवय..' आयशाने मुनव्वर फारुकीबद्दल केले धक्कादायक खुलासे
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
आयशा खान शोमध्ये येऊन एक आठवडा उलटून गेला आहे. सुरुवातीच्या काळात ती मुनव्वरवर नाराज होती. आयशाने देखील मुनव्वरबद्दल काही धक्कादायक खुलासे केले आहेत.
मुंबई, 24 डिसेंबर : बिग बॉस 17 चा एक मजबूत स्पर्धक म्हणजे मुनव्वर फारुकी. या स्पर्धकाच्या खेळाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. पण गेल्या आठवड्यात आयशा खानची बिग बॉसच्या घरात एंट्री झाली आणि मुनव्वर फारुकीचा खेळ ढासळला. बिग बॉसच्या घरात मुन्नवर फारूकीचे सगळे कारनामे बाहेर आले आहेत. काही दिवसांआधी एक ब्लॉगर आयशा खान हिनं मुन्नवरवर गंभीर आरोप केले होते. तिनं स्वत:ला मुन्नवरची एक्स गर्लफ्रेंड असल्याचं सांगितलं आणि नुकतीच तिनं बिग बॉस 17च्या घरात एंट्री केली. तिच्या एंट्रीनंतर मु्न्नवरची करंट गर्लफ्रेंड नाजिला हिनं देखील मुन्नवरवर गंभीर आरोप केले. त्यानंतर आता आयशाने देखील मुनव्वरबद्दल काही धक्कादायक खुलासे केले आहेत.
आयशा खान शोमध्ये येऊन एक आठवडा उलटून गेला आहे. सुरुवातीच्या काळात ती मुनव्वरवर नाराज होती. मात्र, नंतर हे नातं हळूहळू मैत्रीत बदललं. आयशा बाकीच्या स्पर्धकांमध्येही मिसळली आहे. सोबतच तिने मुनव्वरविषयी काही खुलासे केले आहेत. आयशा म्हणाली, "जेव्हा मी त्याच्याशी संबंधित काही ऐकायचे तेव्हा मला कशावरच विश्वास बसला नव्हता." मी त्याला तो सहा महिन्यांपासून त्याच्या मुलासोबत राहत असल्याचं ऐकलं आहे''
advertisement
मोठी बातमी! 'सिंघम 3' च्या सेटवर अजय देवगणचा अपघात; अभिनेत्याच्या दुखापतीमुळं चित्रपटाचं शूटिंग कॅन्सल!
आयशाने सांगितले की, मुनव्वरला मुलींची फसवणूक करण्याची सवय आहे. ती म्हणाली, "हा त्याचा पॅटर्न आहे. त्याला मुलींची फसवणूक करण्याची सवय आहे. माझ्याकडे त्याच्याविरोधात पुरावे आहेत. सुरुवातीपासूनच हा त्याचा पॅटर्न आहे आणि त्याला ते माहीत आहे. पण तो कधीच बदलला नाही. मला मुनव्वर सारखे लोक बदललेले बघायचे आहेत.'' असं ती म्हणाली आहे.
advertisement
आयशाचे म्हणणे ऐकल्यानंतर ईशाने हा सर्व प्रकार अभिषेक आणि मन्नाराला सांगितला. ती म्हणाली की, आयशा म्हणाली की ती मानसिकदृष्ट्या खूप सहन करत आहे. तिने मुनव्वरचे सगळे कारनामे सांगितले तर मुनव्वरचा खेळ खराब होईल. ईशाने असेही सांगितले की, शोमध्ये येण्यापूर्वी आयशा नझिलाला भेटली होती. इतकंच नाही तर मुनव्वरने आयशाला तिच्या वाढदिवशी केरळला नेण्याचं आश्वासन दिलं होतं, पण तो आधीच नाझिलासोबत गेला होता, असंही समोर आलं आहे. त्यामुळे मुनव्वरचे चाहते आता नाराज झाले आहेत.
advertisement
यापूर्वी मुन्नवरची गर्लफ्रेंड नाजिला हिनं देखील त्याच्याविषयी अनेक खुलासे केले होते. नाझीलाने देखील ‘आयशा आणि मुन्नवर यांचं अफेअर होतं हे मला माहिती नव्हतं. मला यापासून पूर्णपणे अलिप्त ठेवण्यात आलं होतं. त्याच्या आयुष्यात मी एकमेव मुलगी आहे असं मला भासवलं होतं.मुन्नवरनं अनेक मुलींबरोबर अफेअर केलेत. पण मला त्यातील कोणाचंही नाव घ्यायचं नाहीये’, असं म्हणत तिनं इन्स्टाग्रामच्या लाइव्ह मध्ये मुन्नवरबरोबर ब्रेकअपची घोषणा केली होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 24, 2023 12:33 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'त्याचे अनेक अफेअर्स... मुलींची फसवणूक करण्याची सवय..' आयशाने मुनव्वर फारुकीबद्दल केले धक्कादायक खुलासे