'इथून चालती हो...' मुंबईत राहून गणेश विसर्जनाबद्दल बरळली अभिनेत्री, नेटकऱ्यांनी झाप-झाप झापलं!

Last Updated:

Ganesh Visarjan : ‘बिग बॉस 18’ फेम कशिश कपूरने गणेशोत्सवातील ढोल-ताशांच्या आवाजावर आक्षेप घेत व्हिडिओ शेअर केला, त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले.

News18
News18
मुंबई : गणेशोत्सव हा महाराष्ट्राचाच नाही, तर संपूर्ण देशाचा सर्वात मोठा सण आहे. महाराष्ट्रात तर या सणात ढोल-ताशांचा गजर आणि मिरवणुका हे अविभाज्य भाग आहेत. पण, नुकतंच ‘बिग बॉस १८’ फेम अभिनेत्री कशिश कपूरने या ढोल-ताशांच्या आवाजावर आक्षेप घेत एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामुळे ती सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

“लोकांना त्रास देऊन कसली भक्ती?”

२ सप्टेंबर रोजी कशिश कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला. यात ती म्हणाली की, ती २० व्या मजल्यावर राहत असतानाही, खाली विसर्जनाच्या मिरवणुकीत वाजत असलेल्या ढोलांचा आवाज तिच्या घरात येत आहे आणि त्यामुळे तिच्या डोक्यात प्रचंड दुखत आहे. तिने पुढे प्रश्न विचारला, “दुसऱ्यांना त्रास देऊन कसली भक्ती होते? मी समजू शकते की विसर्जन आहे, पण ढोल-नगाडे १५-२० मिनिटं किंवा एक तास ठीक आहेत, पण जेव्हा ते साडेतीन तास सतत वाजतात, तेव्हा ते खूप जास्त होतं.”
advertisement
ती म्हणाली की, बाप्पाला खूश करण्यासाठी एवढा मोठा आवाज आवश्यक नाही. “थोडा हिशोब ठेवून ढोल वाजवा. जर योग्य आवाजात वाजवले तर बाप्पा रागवेल का? शांतपणे आणि योग्य आवाजातही भक्ती करता येते.” असं ती म्हणाली.
advertisement
advertisement

“तू इथे राहण्याच्या लायकीची नाही!”

कशिश कपूरच्या या व्हिडिओवर अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. काहींनी तिच्या मताला पाठिंबा दिला, पण बहुतांश नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. एका युजरने लिहिलं, “रात्रीच्या पार्ट्यांमध्ये मोठा आवाज सहन करू शकता, पण तीन तासांच्या भक्तीचा आदर करू शकत नाही? याला त्रास म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे.” दुसऱ्या एकाने थेट म्हटलं, “महाराष्ट्रामध्ये राहून गणेश विसर्जनाबद्दल तक्रार करणं योग्य नाही. असे लोक महाराष्ट्रात राहण्याच्या लायकीचे नाहीत!” तिसऱ्या एकाने लिहिलं, “विसर्जनाचे ढोल फक्त वर्षातून एकदाच वाजतात. ढोल-ताशांना कायदेशीर मान्यता आहे आणि ही महाराष्ट्राची संस्कृती आहे.”
advertisement
आणखी एका युजरने कशिशच्या या व्हिडीओवर कमेंट करत म्हटलं "ही त्यांची भक्ती करायची पद्धत आहे, तुला इतकाच त्रास होत असेल तर तू इअरफोन्सचा वापर करू शकतेस. किंवा गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतून बाहेर जाऊ शकतेस." कशिशच्या या व्हिडिओमुळे तिच्या फॉलोअर्सची संख्याही कमी होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
'इथून चालती हो...' मुंबईत राहून गणेश विसर्जनाबद्दल बरळली अभिनेत्री, नेटकऱ्यांनी झाप-झाप झापलं!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement