Bigg Boss फेम तान्या मित्तल अडकली गुंडांच्या जाळ्यात, वाचवायला आला बॉलिवूडचा 'डॉन', VIDEO पाहून पोट धरून हसाल
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bigg Boss fame Tanya Mittal Viral Video: बिग बॉसच्या घरात असताना एकता कपूरने तान्या मित्तलला एक ऑफर दिली होती. मात्र आता मोठ्या पडद्यावर येण्याआधीच तान्याने जाहिरात विश्वात आपली छाप सोडायला सुरुवात केली आहे.
मुंबई : बिग बॉस १९ मधून प्रसिद्धीझोतात आलेली तान्या मित्तल शो संपल्यानंतरही तितकीच लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर तिची तुफान चर्चा पाहायला मिळतेय. नुकतंच तान्या मित्तलचा एक नवा व्हिडीओ समोर आला असून यामध्ये ती बॉलिवूडचे लोकप्रिय कॉमेडियन राजपाल यादव यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसतेय. बिग बॉसच्या घरात आपल्या पैशांचा शो-ऑफ करणारी आणि कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत रडणारी तान्या मित्तल आता आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसते.
बिग बॉसच्या घरात असताना प्रसिद्ध निर्माता एकता कपूरने तान्या मित्तलला एक ऑफर दिली होती. मात्र आता मोठ्या पडद्यावर येण्याआधीच तान्याने जाहिरात विश्वात आपली छाप सोडायला सुरुवात केली आहे. काही तासांपूर्वीच राजपाल यादव यांनी एक अतिशय गंमतीशीर जाहिरातीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ते तान्याला गुंडांपासून वाचवताना दिसत आहेत. या दोघांचा अनोखा अंदाज असलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर आगीसारखा पसरला आहे.
advertisement
जेव्हा 'छोटा डॉन'ने वाचवले तान्याचे प्राण
एका ब्युटी ग्रूमिंग अॅपच्या या जाहिरातीत प्रचंड ड्रामा पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये तान्या एका लाल रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत असून तिला काही गुंडांनी घेरले आहे. तान्या स्वतःला वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न करते, पण गुंड तिला सोडायला तयार नाहीत. अशातच, काळ्या रंगाच्या कोटमध्ये राजपाल यादव यांची 'छोटा डॉन' स्टाईलमध्ये एन्ट्री होते. त्यांना पाहताच गुंडांची घाबरगुंडी उडते. छोटा डॉनचा मार खाऊन ते तिथून पळ काढतात. मात्र, खरा ट्विस्ट तेव्हाच येतो. व्हिडिओच्या शेवटी तान्या निवांतपणे घरात फेशियल करताना आपल्या ब्युटी प्रोफेशनलला तिच्या स्वप्नात घडलेला हा सगळा किस्सा सांगताना दिसते.
advertisement
advertisement
जेलमधून बाहेर आल्यावर राजपाल यादव यांचे पहिले काम
राजपाल यादव यांच्या चाहत्यांसाठी ही जाहिरात खूप खास आहे. काही कायदेशीर कटकटींमुळे जेलची हवा खाल्ल्यानंतर, जामिनावर बाहेर आल्यावर राजपाल यांची ही पहिलीच मोठी जाहिरात आहे. "छोटा पंडित इज बॅक!" अशा कमेंट्स करत चाहते त्यांचे स्वागत करत आहेत. तान्या आणि राजपाल यांची ही केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच मजेशीर वाटत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 13, 2026 6:56 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss फेम तान्या मित्तल अडकली गुंडांच्या जाळ्यात, वाचवायला आला बॉलिवूडचा 'डॉन', VIDEO पाहून पोट धरून हसाल









