Bobby Deol Animal : हेच ते ॲनिमलमध्ये बॅाबीच्या एंट्रीचं गाणं, ऐकून तुम्हीही कराल डान्स, Behind Story खूपच इंटरेस्टिंग
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अॅनिमल सिनेमातील बॉबी देओलच्या एंट्रीच्या गाण्यानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. त्याच्या एंट्रीला वाजत असलेल्या गाण्यामागची स्टोरी तुम्हाला माहिती आहे का?
मुंबई, 06 डिसेंबर : रणबीर कपूरचा अॅनिमल हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. दमदार अॅक्शन सीन्स आणि वॉयलेन्सनं प्रेक्षक चांगलेच हादरून गेलेत. अभिनेता रणबीर कपूर सिनेमात प्रमुख भूमिकेत असला तरी अभिनेता बॉबी देओल भाव घाऊन जातो. सिनेमात बॉबीला कमी स्क्रिन टाइम मिळाला असला तरी प्रेक्षकांच्या मनावर त्यानं पाडलेली छाप न विसरण्यासारखी आहे. सिनेमातील बॉबी अँगर असो, त्याची अभिनयाची शैली ते त्याची धमाकेदार एंट्री. बॉबीच्या एंट्रीनं थिएटरमध्ये चांगलाच धमाल आणली आहे. म्युट व्हिलन बनलेल्या बॉबी देओलची एंट्री मात्र एका सॉलिड गाण्यानं होते. त्या गाण्याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. ज्यांनी ज्यांनी अॅनिमल मधील बॉबीची एंट्री पाहिली त्यानंतर प्रत्येकानं ते गाणं एकदा तरी इंटरनेटवर शोधलं असेल. कोणतं आहे के गाणं? पाहूयात.
अॅनिमल सिनेमातील बॉबी देओलच्या एंट्रीच्या गाण्यानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. जमाल जमालू या गाण्यावर बॉबीची एंट्री होते. नवरदेवाच्या वेशात बसलेला बॉबी निकाह करत एंट्री घेतो आणि त्याच्या एंट्रीला हे गाणं वाजतं. बॉबी देओलच्या पावर पॅक परफॉर्मन्सचं प्रेक्षक कौतुक करत आहेत. तर दुसरीकडे त्या गाण्याची देखील चर्चा आहे.
advertisement
बॉबी देओलच्या एंट्रीला वाजत असलेलं जमाल जमालू हे गाणं जवळपास 50 वर्ष जूनं आहे. हे एक ईराणी गाणं असून या गाण्याचं म्युझिक खास करून सगळ्यांच्या पसंतीस उतरलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे गाणं एक कविता आहे. ईराणी कवी Bijan Samandar यांनी ही लिहिली आहे. 1958मध्ये रेंडिशन Shirazi Choirvr यांनी हे गाणं गायलं आहे. Kharazemi Girl's High Schoolमध्ये शिकणाऱ्या काही शालेय विद्यार्थींच्या ग्रुपनं हे गाणं गायलं होतं. या गाण्याची लोकप्रियता इतकी वाढली की अल्पावधीतच हे गाणं ईराणी पार्टी आणि लग्नात वाजायला सुरूवात झाली.
advertisement
Entry of #Bobydeol in #AnimalReview pic.twitter.com/a9jhgKu8XJ
— Equity Fraise (@EquityFraise) December 3, 2023
2013मध्ये या गाण्याचा एक व्हिडीओ युट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. अॅनिमल सिनेमात हे गाणं ऐकल्यानंतर त्याचे व्हयूज चांगलेच वाढले आहेत. ईराणी भाषेतील हे गाणं ट्रान्सलेट केलं तर त्याचा अर्थ असा होतो की, ओ माय क्यूटनेस, माझ्या मनाशी खेळू नकोस. तू प्रवासाला निघाला आहेस आणि मी वेडा होतोय. ओ माय लव…
advertisement
अॅनिमल सिनेमानं रिलीजच्या दिवसापासून तगडी कमाई केली आहे. मंडे टेस्टमध्ये देखील अॅनिमल हिट ठरला आहे. सिनेमानं आतापर्यंत 246.23 कोटी रूपये कमावले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 06, 2023 9:14 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bobby Deol Animal : हेच ते ॲनिमलमध्ये बॅाबीच्या एंट्रीचं गाणं, ऐकून तुम्हीही कराल डान्स, Behind Story खूपच इंटरेस्टिंग