शाहरुखची पावर प्ले मॅनेजर, पूजा दादलानीचा पगार बॉलिवूड हिरोंपेक्षा जास्त, किती कमावते?
- Published by:Suraj Yadav
- Edited by:Minal Gurav
Last Updated:
Shahrukh Khan Manager : किंग खान शाहरुख खानची मॅनेजर पूजा दादलानीचा पगार नेमका किती आहे ? ती शाहरुखची कोणत्या वर्षापासून मॅनेजर आहे. ती शाहरुख सोवत अनेक इवेंचॉट्स मध्ये दिसते.
बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने आपल्या चाहत्यांसोबत हल्लीच एका वेगळ्या ढंगात आपला 60वा वाढदिवस साजरा केला होता. सोबतच त्याची मॅनेजर पूजा दादलानी हिचाही त्याच दिवशी वाढदिवस होता. ती त्याची एक विश्वासू मॅनेजर आहे. शाहरुखचे कितीतरी प्रोजेक्टची आर्थिक गणिते ती सांभाळते. तिचा पगार किती असेल याचा आपण विचार केला का?
पूजा दादलानी ही अभिनेता शाहरुखची 12 वर्षांपासून मॅनेजर आहे. ती त्याची फक्त एक मॅनेजरच नाही तर त्यापेक्षा चांगले नाते तिने ठेवले आहे. तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल निर्णयांसाठी ती कायमच प्रमुख आणि योग्य भूमिका बजावत असते. किंग खानच्या चित्रपटाच्या प्रोजेक्ट्स , ब्रँड पासून ते प्रोडक्शन हाऊसची जबाबदारी आणि शाहरुखच्या या मोठ्या यशाच्या मागे ही महत्वाची भूमिका बजावत आहे. ती शाहरुखसोबत अनेक इवेंट्स आणि प्रीमियर्स मध्ये दिसते. ती थोडक्यात पडद्यामागची खरी कलाकार आहे.
advertisement
पूजा दादलानीचा पगार किती ?
सियासत, मनीकंट्रोल आणि इतर मीडियाच्या रिपोर्टनूसार पूजा दादलानी ही दरवर्षी 7 ते 9 करोड रुपये कमवते. हा आकडा एखाद्या बॉलिवूडच्या अभिनेत्यापेक्षा कमी नाही.
केव्हा पासून संभाळते आहे शाहरुखचे काम ?
view commentsसियासत मीडियाच्या रिपोर्टनूसार , पूजा दादलानी 2012 च्या 'कुछ कुछ होता है' पासून किंग शाहरुखचे काम पाहत आहे. पूजा ही मुंबईमध्येच लहानाची मोठी झाली आहे. आता शाहरुखचे सामान्य व्यवहार ते चित्रपटाच्या आर्थिक बाजूमध्ये तीची महत्वाची भूमिका असते. शाहरुखचे चित्रपट रिलीज आणि इतर प्रोजेक्ट प्लॅनिंग ते कायदेशीर बाबी आणि वेगवेगळे ब्रॅड्स ही सगळी कामे ती जबाबदारीने सांभाळते. तसेच ती रेड चिली एंटरटेनमेंट आणि शाहरुखची आईपीएल टीम कोलकत्ता नाईट राइडर्सचे कामही पाहते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 16, 2025 9:33 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
शाहरुखची पावर प्ले मॅनेजर, पूजा दादलानीचा पगार बॉलिवूड हिरोंपेक्षा जास्त, किती कमावते?


