Mamta Kulkarni on Dawood Ibrahim : 'दाऊद इब्राहिम आतंकवादी नाही', अभिनेत्री ममता कुलकर्णीचं शॉकिंग स्टेटमेन्ट

Last Updated:

Mamta Kulkarni on Dawood Ibrahim : ममता कुलकर्णीनं अनेक वर्षांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊदवर भाष्य केलं आहे. दाऊदवर ममताने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

News18
News18
बॉलिवूडमध्ये 90चं दशकं गाजवणारी प्रसिद्ध अभिनेत्री ममत कुलकर्णी. 2002 साली 2000 कोटींच्या ड्रग्ज तस्करीच्या आरोपानंतर ड्रग्ज माफिया विक्की गोस्वामीबरोबर लग्न करून ती देश सोडून पळून गेली. 2024 मध्ये महाकुंभ निमित्तानं ममता कुलकर्णी 25 वर्षांनी भारतात आली. भारतात आल्यानंतर ती थेट महामंडलेश्वर बनली. महामंडलेश्वर झाल्यानंतर ममतावर प्रचंड टीका करण्यात आली.
बॉलिवूडमध्ये करिअर करायला आलेल्या ममताचं आयुष्य नेहमीच वादात राहिलं. तिच्या आयुष्यात अनेक उतार चढाव आले. तिचं नाव अंडवर्ल्ड डॉन छोटा राजनशी जोडण्यात आलं होतं. 1998 साली दोघांच्या नात्याची खूप चर्चा झाली.
'चायना गेट' या सिनेमाच्या सेटवर घडलेल्या घटनेनंतर ममताचं अंडरवर्ल्डशी नातं वाढलं. राजन बॉलिवूडच्या अनेक फिल्ममेकर्सना धमक्या देऊ लागला होता. अंडरवर्ल्डशी कनेक्शनचा ममताच्या करिअरवर मोठा परिणाम झाला. राजकुमार संतोषी यांच्याबरोबर मतभेद झाल्यामुळे तिला सिनेमातून काढण्यात आलं. तिने राजकुमार संतोषी यांच्यावर लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही लावला होता.
advertisement
दरम्यान ममता कुलकर्णीनं अनेक वर्षांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊदवर भाष्य केलं आहे. गोरखपुरमध्ये एका प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना ममत म्हणाली, "दाऊद इब्राहिम आतंकवाद नाही. तो ना कोणी आतंकवादी आहे ना कोणत्या बॉम्ब ब्लॉस्टच्या घटनेशी त्याचा संबंध आहे. मिडिया आणि राजकीय ताकदीने एक कट करून त्याचं नाव बदनाम केलं. कोणीही गुन्हेगार सिद्ध होण्यासाठी त्याच्यावरचे आरोप सिद्ध होणं गरजेचं आहे. प्रचार केला म्हणून कोणी अपराधी होत नाही."
advertisement
ममता पुढे म्हणाली, "दाऊदशी माझा दूर दूरवर कोणताही संबंध नाही. एका व्यक्तीचं नाव नक्कीच होतं. पण तुम्ही बघा, त्याने कधीही बॉम्बस्फोट केला नाही. त्याने देशविरोधी असं कोणतंही काम केलं नाही. ज्याचं नाव ( विक्की गोस्वामी ) माझ्या नावाशी जोडण्यात आलं त्या व्यक्तीनेही कधीच बॉम्बस्फोट केला नाही. मी माझ्या आयुष्यात कधीही दाऊदला भेटले नाही."
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Mamta Kulkarni on Dawood Ibrahim : 'दाऊद इब्राहिम आतंकवादी नाही', अभिनेत्री ममता कुलकर्णीचं शॉकिंग स्टेटमेन्ट
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement