Bollywood Singer : तिनदा मोडलं लग्न, तरी हौस संपेना! फेमस गायक चौथ्यांदा चढणार बोहल्यावर?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bollywood : भारतीय मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता, गायक तीन वेळा लग्नबंधनात अडकला असून चौथ्यांदा बोहल्यावर चढण्याची त्याने इच्छा व्यक्त केली आहे.
Bollywood Famous Singer : भारतीय मनोरंजनसृष्टीतील एक लोकप्रिय गायक, गीतकार आणि अभिनेता सध्या चर्चेत आहे. आजवर आपल्या करिअरमध्ये त्याने अनेक हिट गाणी दिली आहेत. आपल्या कामासह वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा हा गायक चर्चेत आला आहे. या गायकाचे वडील विनोदवीर असल्याचं फार कमी मंडळींना माहिती आहे. बॉलिवूड गाजवणाऱ्या या लोकप्रिय गायकाने आतापर्यंत तीन वेळा लग्न केलं आहे. तसेच आता चौथ्यांदा बोहल्यावर चढण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे. गायकाने स्वत: एका मुलाखतीत याबद्दल माहिती दिली आहे.
बॉलिवूडच्या या लोकप्रिय गायकाने आपल्या करिअरची सुरुवात 1996 मध्ये 'सुनो' या अल्बमच्या माध्यमातून केली. या पहिल्यावहिल्या अल्बममधलं त्याचं 'ओ सनम' हे गाणं चांगलच हिट झालं. त्यानंतर या गायकाने अनेक हिट अल्बम आणि गाणी दिली आहेत. "एक पल का जीना','क्यों चलती है पवन" आणि "ना तुम जानो ना हम", अशा अनेक गाण्यांचा यात समावेश आहे. एक यशस्वी गायक असण्यासोबत हा एक यशस्वी अभिनेतादेखील आहे. अनेक चित्रपटांत त्याने काम केलं आहे.
advertisement
बॉलिवूडच्या या लोकप्रिय गायकाचं नाव लकी अली आहे. विशेष म्हणजे लकी अलीचं खरं नाव मकसूद मोहम्मद अली असं आहे. लकी अलीने आतापर्यंत तीन वेळा लग्न केलं आहे. त्याला पाच मुलं आहेत. लकी अलीचं पहिलं लग्न मेगन जेन मकक्लियरीसोबत झालं होतं. त्यावेळी त्याला दोन मुलं झाली. पण हे लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर दोघं विभक्त झाले. त्यानंतर लकी अनाहिता या पारसी महिलेसोबत विवाहबंधनात अडकला. लग्नासाठी त्यांनी धर्मही बदलून आपलं नाव इनाया असं ठेवलं होतं. इनायापासून लकी अली यांना दोन मुलं झाली. लकी आणि इनायचं लग्नही टिकलं नाही. त्यानंतर लकीने 25 वर्षीय ब्रिटिश मॉडेल केट एलिजाबेथसोबत तिसरं लग्न केलं. अखेर 2017 मध्ये ते विभक्त झाले.
advertisement
लकी अलीने आता वयाच्या 66 व्या वर्षी चौंथ्यांदा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. लकी अलीचं पुन्हा लग्नबंधनात अडकण्याचं स्वप्न आहे. लकी अली यांनी लग्नाबाबत केलेलं वक्तव्य मजेत केलंय की गंभीरपणे केलंय हे अद्याप समोर आलेलं नाही.
लकी अलीने 'कहो ना प्यार है'मधील 'ना तुम जानो ना हम' आणि 'एक पल का जीना' ही गाणी गायली होती. या गाण्यांमुळे लकी अलीच्या चाहतावर्गात वाढ झाली. तसेच त्याची 'सफरनामा', 'दो और दो प्यार', 'तू है कहां' ही गाणीदेखील चांगलीच लोकप्रिय झाली आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 19, 2025 3:31 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bollywood Singer : तिनदा मोडलं लग्न, तरी हौस संपेना! फेमस गायक चौथ्यांदा चढणार बोहल्यावर?