हिंमत है तो आ... यए खडा है हिंदुस्तान, सनी देओलच्या 'Border 2'चा टीझर आऊट! अंगावर शहारे आणणारी 2 मिनिटांची प्रत्येक फ्रेम
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Border 2 : सनी देओल अभिनीत 'बॉर्डर 2' या चित्रपटाचा जबरदस्त टीझर आऊट झाला आहे. नवीन वर्षात ही बहुप्रतीक्षित फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Border 2 : सनी देओलच्या (Sunny Deol) आगामी 'बॉर्डर 2' या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 23 जानेवारी 2026 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा जबरदस्त टीझर आऊट झाला आहे. 16 डिसेंबरच्या विजय दिवसाचे औचित्य साधत हा टीझर आऊट करण्यात आला आहे. टी-सीरिजच्या बॅनरअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. या चित्रपटात सनी देओल, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी आणि वरुण धवन हे स्टार्स दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंह यांनी केले आहे. सनी देओलला पुन्हा एकदा या चित्रपटात पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.
'बॉर्डर 2' हा चित्रपट 1997 मध्ये रिलीज झालेल्या 'बॉर्डर' या चित्रपटाचा सीक्वेल आहे. 'बॉर्डर' हा ब्लॉकबस्टर ठरला होता. 'बॉर्डर' चित्रपट भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1971 मध्ये झालेल्या युद्धावर आधारित होता. या चित्रपटात भारतीय सैनिकांचे शौर्य आणि संघर्ष दाखवण्यात आले होते. भारतीय लष्कराने पाकिस्तानला कसे गुडघे टेकायला भाग पाडले, हेही चित्रपटात दाखवण्यात आले होते. आता 'बॉर्डर 2'मध्ये पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध पाहायला मिळेल.
advertisement
'बॉर्डर 2'च्या टीझरमध्ये काय आहे?
'बॉर्डर 2'मध्ये सनी देओलचा पुन्हा एकदा तोच दमदार अंदाज पाहायला मिळत आहे. युद्धावर आधारित असलेल्या या चित्रपटात देशभक्ती, कर्तव्य अशा अनेक गोष्टी या टीझरमध्ये पाहायला मिळत आहेत. दमदार संवाद, अंगावर काटा आणणारं पार्श्वसंगीत, वास्तवदर्शी युद्ध दृश्ये आणि योग्यपद्धतीने केलेली बांधणी या सर्व गोष्टींमुळे टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून भूतकाळातील आणि वर्तमानातील दोन्ही काळातील सैनिकांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली देण्यात आली आहे. टीझरवरुन स्पष्ट होतं की 'बॉर्डर 2' ही फिल्म 2026 च्या सुरुवातीलाच दणदणीत कमाई करणार आहे.
advertisement
टीझर रिलीज होण्यापूर्वी चित्रपटाची टीम सिद्धिविनायक मंदिरात पोहोचली होती. यावेळी भूषण कुमार, निधी दत्ता आणि अहान शेट्टी दिसून आले. मात्र सनी देओल, दिलजीत दोसांझ आणि वरुण धवन या वेळी उपस्थित नव्हते. सिद्धिविनायक मंदिरातील त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 16, 2025 1:49 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
हिंमत है तो आ... यए खडा है हिंदुस्तान, सनी देओलच्या 'Border 2'चा टीझर आऊट! अंगावर शहारे आणणारी 2 मिनिटांची प्रत्येक फ्रेम










