Dashavatar Box Office Collection: ‘दशावतार’चा बॉक्स ऑफिसवर धमाका कायम, तिसऱ्या आठवड्यातही कमाईचा आकडा थक्क करणारा
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Dashavatar Box Office Collection: मराठी चित्रपटसृष्टीत 'दशावतार' ने जोरदार घोडदौड केली आहे. 12 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला हा सिनेमा तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करूनही थिएटरमध्ये प्रेक्षकांना आकर्षित करतोय.
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत 'दशावतार' ने जोरदार घोडदौड केली आहे. 12 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला हा सिनेमा तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करूनही थिएटरमध्ये प्रेक्षकांना आकर्षित करतोय. पहिल्या आठवड्यापासूनच या चित्रपटाने चांगली कमाई केली असून, आता तो 20 कोटींच्या टप्प्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे.
पहिल्या आठवड्यात ‘दशावतार’ने तब्बल 9.20 कोटींचा गल्ला जमा केला. दुसऱ्या आठवड्यात थोडी घसरण झाली असली तरीही 9.25 कोटींची कमाई झाली. तिसऱ्या आठवड्यात शुक्रवारची कमाई अवघी 45 लाख इतकी होती, जी चित्रपटाच्या आतापर्यंतच्या प्रवासातील सर्वात कमी रक्कम होती. मात्र शनिवारी (27 सप्टेंबर) चित्रपटाने पुन्हा उभारी घेतली आणि जवळपास 90 लाखांची कमाई केली. त्यामुळे 27 सप्टेंबरपर्यंत एकूण गल्ला 19.80 कोटींवर पोहोचला आहे. रविवारीची (28 सप्टेंबर) आकडेवारी आल्यानंतर 20 कोटींचा टप्पा सहज पार होईल, असा अंदाज वर्तवला जातोय.
advertisement
या चित्रपटासाठी दुसऱ्या आठवड्यातील रविवार विशेष ठरला. 21 सप्टेंबर रोजी चित्रपटाने तब्बल 3 कोटींची कमाई करून स्वतःचा विक्रम प्रस्थापित केला होता. सुबोध खानोलकर दिग्दर्शित या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, प्रियदर्शिनी इंदलकर, सिद्धार्थ मेनन, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, रवी काळे, अभिनय बेर्डे, सुनील तावडे आणि आरती वडगबाळकर यांसारखे नामांकित कलाकार झळकले आहेत. तसेच कोकणातील स्थानिक कलाकारांचाही या सिनेमात सहभाग आहे.
advertisement
‘दशावतार’ची भव्यता, कथानक आणि कलाकारांची ताकदवान भूमिका यामुळे प्रेक्षकांना हा सिनेमा आकर्षित करतोय. त्यामुळे तिसऱ्या आठवड्यानंतरही या चित्रपटाची कमाई सुरू राहण्याची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 28, 2025 12:07 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Dashavatar Box Office Collection: ‘दशावतार’चा बॉक्स ऑफिसवर धमाका कायम, तिसऱ्या आठवड्यातही कमाईचा आकडा थक्क करणारा