Dashavatar Collection : 'दशावतार' बॉक्स ऑफिसवर हिट! 7 दिवसांत 10 कोटींहून अधिक कमाई, समोर आलं टोटल कलेक्शन
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Dashavatar Collection : 'दशावतार' सिनेमानं 10 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. प्रेक्षकांच्या भरभरून प्रतिसादाने आणि प्रेमाने मराठी सिनेमाची खरी ताकद दाखवून दिली आहे.
मुंबई : मराठी सिनेसृष्टीसाठी एका आनंदाची आणि अभिमानाची माहिती समोर आली आहे. मागील आठवडाभरापासून थिएटरमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या 'दशावतार' सिनेमानं इतिहास रचला आहे. 'दशावतार' सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रातूनच नाही तर देश आणि विदेशातून प्रेम मिळतंय. रिलीजच्या अवघ्या 7 दिवसांत 'दशावतार' सिनेमानं 10 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. प्रेक्षकांच्या भरभरून प्रतिसादाने आणि प्रेमाने मराठी सिनेमाची खरी ताकद दाखवून दिली आहे.
'दशावतार' सिनेमानं पहिल्या दिवसापासूनच यशस्वी घोडदौड सुरू ठेवली. रिलीजनंतर सिनेमाच्या कमाईत दरदिवशी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. अखेर सिनेमानं 10 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली आहे. बॉलिवूड सिनेमांच्या गर्दीत 'दशावतार'चे खेळ जोमात सुरू असून सिनेमा आणखी बक्कळ कमाई करेल यात शंका नाही.
advertisement
'दशावतार' सिनेमानं पहिल्या तीन दिवसात 5 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर पाचव्या दिवशी सिनेमाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 9.45 कोटी इतकं झालं होतं. त्यानंतर रिलीजच्या अवघ्या सातव्या दिवशी सिनेमानं 10.80 कोटींचा गल्ला जमवत दिमाखात 10 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली आहे.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा अभिनय आणि सुबोध खानोलकरचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला आहे. सुरुवातीला 325 स्क्रिन्समधून सिनेमाला प्रेक्षकांच्या भेटीला आला. तेव्हा सिनेमाचे 600 शोज् होते. शनिवारी हा आकडा 800 झाला. रविवारी यामध्ये वाढ होऊन तो 975 शोज् लावण्यात आले. 'दशावतार' पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली असून थिएटरवर हाऊसफुल्लचा बोर्ड झळकतोय.
advertisement
'दशावतार' सिनेमात दिलीप प्रभावळकर, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, अभिनय बेर्डे, आरती वडगबाळकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 19, 2025 2:15 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Dashavatar Collection : 'दशावतार' बॉक्स ऑफिसवर हिट! 7 दिवसांत 10 कोटींहून अधिक कमाई, समोर आलं टोटल कलेक्शन