advertisement

Desi Bling: बिग बॉसनंतर तेजस्वी-करणचा नवा रिअ‍ॅलिटी शो, पहिल्याच प्रोमोमध्ये ढसाढसा रडली अभिनेत्री, VIDEO

Last Updated:

Netflix’s Desi Bling: टीव्ही इंडस्ट्रीची लाडकी जोडी करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश दुबईच्या सर्वात उच्चभ्रू वर्तुळात एन्ट्री करताना दिसणार आहेत.

News18
News18
मुंबई : दुबई म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ते उंचच उंच टॉवर्स, अफाट पैसा, लॅविश पार्ट्या आणि सोन्याचा लखलखाट. पण या झगमगाटाच्या मागे दडलेला ड्रामा, नात्यांमधील गुंतागुंत आणि स्टेटससाठी चाललेली चढाओढ कधी पाहिली आहे का? नेटफ्लिक्स इंडियाने २०२६ मधील आपल्या सर्वात मोठ्या रिअ‍ॅलिटी शोची घोषणा केली असून, त्याचं नाव आहे 'देसी ब्लिंग' (Desi Bling). विशेष म्हणजे, या शोमध्ये टीव्ही इंडस्ट्रीची लाडकी जोडी करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश दुबईच्या सर्वात उच्चभ्रू वर्तुळात एन्ट्री करताना दिसणार आहेत.

काय आहे 'देसी ब्लिंग'?

हा रिअ‍ॅलिटी शो दुबईतील देसी श्रीमंतांच्या खासगी आयुष्यावर प्रकाश टाकतो. जिथे व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्डपेक्षा वेगाने गॉसिप्स पसरतात आणि जिथे पैसा बोलतो तिथे नाती कशी टिकतात, याची झलक या शोमध्ये पाहायला मिळेल. करण आणि तेजस्वी या वर्तुळात नवीन पाहुणे म्हणून प्रवेश करतील. त्यांच्या एन्ट्रीमुळे दुबईतील जुन्या मैत्रीत कशी फूट पडते आणि कोणाचे मुखवटे गळून पडतात, हे पाहणं अत्यंत रंजक ठरणार आहे.
advertisement

हाय-ग्लोस, हाय-ड्रामा!

शोच्या निर्मात्यांनी सांगितलं की, "आम्हाला दुबईच्या त्या जगाचं सत्य दाखवायचं होतं, जे नेहेमीच पिक्चर-परफेक्ट दिसतं. इथे निष्ठा क्षणात बदलते आणि श्रीमंतीच्या जोरावर मैत्रीचे सौदे होतात. करण आणि तेजस्वीच्या येण्याने या आलिशान जगाची समीकरणं पूर्णपणे बदलणार आहेत. हा शो पूर्णपणे अनफिल्टर्ड, बोल्ड आणि मसालेदार असणार आहे."
advertisement












View this post on Instagram























A post shared by Netflix India (@netflix_in)



advertisement
करण-तेजस्वीसोबतच दुबईच्या एलिट सर्कलमधील सतीश सणपाल, ताबिंदा सणपाल, रिझवान साजन, अदेल साजन, पामेला सेरेना आणि जान्हवी गौर यांसारखे दिग्गज यात दिसणार आहेत. 'डिफरंट प्रॉडक्शन्स'ने या शोची निर्मिती केली असून माझन लाहाम आणि लामा समद हे कार्यकारी निर्माते आहेत.

भारतात नेटफ्लिक्सने पूर्ण केली दहा वर्ष

'नेक्स्ट ऑन नेटफ्लिक्स २०२६' च्या प्रेझेंटेशनमध्ये नेटफ्लिक्स इंडियाच्या कंटेंट व्हाईस प्रेसिडेंट मोनिका शेरगिल यांनी आपली भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, "भारतातील नेटफ्लिक्सच्या दहा वर्षांचा प्रवास हा प्रेक्षकांमुळेच यशस्वी झाला आहे. भारत हा अनेक संस्कृतींचा देश आहे आणि इथे प्रत्येक प्रेक्षकाची आवड वेगळी आहे. 'देसी ब्लिंग'च्या माध्यमातून आम्ही जागतिक स्तरावर राहणाऱ्या भारतीयांची एक वेगळी कथा जगासमोर आणत आहोत."
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Desi Bling: बिग बॉसनंतर तेजस्वी-करणचा नवा रिअ‍ॅलिटी शो, पहिल्याच प्रोमोमध्ये ढसाढसा रडली अभिनेत्री, VIDEO
Next Article
advertisement
Ajit Pawar:  अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा खळबळजनक दावा, ''एका व्यक्तीनं विमानातून...''
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा ख
  • अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाने सगळ्या राज्यालाच मोठा धक्का बसला आहे.

  • ष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विमान अपघात प्रकरणात नवा दावा केला

  • अमोल मिटकरींनी या प्रकरणाला आता 'घातपाता'चे नवे वळण दिले आहे.

View All
advertisement