Devmanus Serial: गौतमी पाटीलच्या जाळ्यात अडकणार 'देवमाणूस'? मालिकेत थरारक ट्विस्ट, पाहा VIDEO
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Gautami Patil in Devmanus Serial: झी मराठीवरील लोकप्रिय आणि प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेली मालिका 'देवमाणूस' पुन्हा एकदा नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
मुंबई: झी मराठीवरील लोकप्रिय आणि प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेली मालिका 'देवमाणूस' पुन्हा एकदा नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 2 जूनपासून 'देवमाणूस- मधला अध्याय' या नावाने ही मालिका पुन्हा सुरू झाली असून, पहिल्या एपिसोडपासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा सस्पेन्स आणि थरार अनुभवायला मिळतोय. अशातच मालिकेचा नवा प्रोमो समोर आलाय, ज्यामुळे प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
'देवमाणूस- मधला अध्याय' मालिकेचा नवा प्रोमो समोर आलाय. यामध्ये चक्क गौतमी पाटीलची एन्ट्री दिसतेय. त्यामुळे 'सबसे कातिल' गौतमी पाटीलचे चाहते तर शॉक झालेत. तिच्या दमदार एन्ट्रीने येत्या एपिसोडची उत्सुकता शिगेला पोहोचवलेली आहे.
'सबसे कातिल' गौतमी पाटील अजित कुमारची करणार का शिकार? असा प्रश्न प्रोमो पाहून पडलाय. प्रोमो व्हिडीओमध्ये दिसतंय की, गौतमी पाटील अजित कुमारच्या समोर आली आहे. गौतमी अजित कुमारला म्हणते की, "मला या मापाचं ब्लाऊज शिऊन पाहिजे." अजित म्हणतो, "मी जुन्या मापावर ब्लाऊज शिवत नाही, मी डायरेक्ट माप घेतो." मग गौतमी म्हणते, "खरं सांग काळजावर हात ठेवून, माझ्यावर चान्स मारण्यासाठी माप घेतोयेस ना? तुला मी कोण आहे, माहितीय ना?"
advertisement
पुढे अजित कुमार म्हणतो, "कोणीची तरी बहिण आहात, मुलगी आहात, कोणाची बायकोही असाल." गौतमी म्हणते, "अजून लग्न नाही झालं माझं." त्यामुळे आता येत्या भागात कोण कोणाला घायाळ करणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
advertisement
दरम्यान, 'देवमाणूस – मधला अध्याय' क्राईम ड्रामा आहे. नवनवे ट्विस्ट आणि थरार प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. विशेषतः जुन्या चाहत्यांमध्ये मालिकेच्या पुनरागमनाची उत्सुकता आधीपासूनच वाढली होती आणि पहिल्याच आठवड्यात त्याला भरघोस TRPही मिळतो आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 08, 2025 9:22 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Devmanus Serial: गौतमी पाटीलच्या जाळ्यात अडकणार 'देवमाणूस'? मालिकेत थरारक ट्विस्ट, पाहा VIDEO