5 सिनेमे गाजवले, दिग्पाल लांजेकरच्या नव्या सिनेमात मोठा बदल, चिन्मय मांडलेकर ऐवजी हा अभिनेता शिवरायांच्या भूमिकेत
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Chinmay Mandlekar: दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या आगामी ऐतिहासिक चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी मोठा बदल करण्यात आला असून, यावेळी चिन्मय मांडलेकरऐवजी अभिजीत श्वेतचंद्र झळकणार आहे.
मुंबई: दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टक मालिकेने मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांचा नवा अध्याय उघडला. आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी सलग पाच चित्रपट गाजवत प्रेक्षकांची मनं जिंकली. मात्र आता दिग्पाल लांजेकर यांच्या आगामी भव्य ऐतिहासिक चित्रपटात एक मोठा आणि धक्कादायक बदल पाहायला मिळणार आहे.
advertisement
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित आणि पॅनोरमा स्टुडिओज व मुगाफी निर्मित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर नव्हे, तर नव्या दमाचा उमदा अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र झळकणार आहे. हा बदल सध्या मराठी सिनेसृष्टीत चर्चेचा विषय ठरत आहे.
advertisement
advertisement
‘शिवराज अष्टक’मधील सहावे पुष्प असलेल्या या चित्रपटातून शिवकालीन इतिहासातील अत्यंत धाडसी आणि जोखमीची घटना, छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक आग्रा भेट भव्य स्वरूपात मांडण्यात येणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका विशेष कार्यक्रमात अभिजीत श्वेतचंद्र यांच्या रूपातील छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रथमदर्शन प्रेक्षकांना अनुभवता आले.
advertisement
भरजरी वस्त्र, शिरोभागी जिरेटोप, भवानी तलवार, घोड्यावर स्वार झालेला शिवरायांचा तेजस्वी अवतार आणि ढोल-ताशांच्या गजरात सादर झालेला हा प्रसंग उपस्थितांना अक्षरशः भारावून टाकणारा ठरला. याच कार्यक्रमात चित्रपटातील ‘महारुद्र शिवराय’ या गीताचे दमदार सादरीकरणही करण्यात आले.
advertisement
या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांचे असून, कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक (पॅनोरमा स्टुडिओज), विपुल अग्रवाल, जेनील परमार (मुगाफी) आणि मुरलीधर छतवानी हे निर्माते आहेत. चित्रपटाचे संगीत अवधूत गांधी आणि मयूर राऊत आहे.
advertisement
30 जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, धोरणात्मक चातुर्य आणि नेतृत्वगुण नव्या दृष्टिकोनातून पाहायला मिळणार असून, चिन्मय मांडलेकरनंतर अभिजीत श्वेतचंद्र हा शिवरायांच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या मनावर किती ठसा उमटवतो, याकडे संपूर्ण मराठी सिनेसृष्टीचे लक्ष लागले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 04, 2026 8:09 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
5 सिनेमे गाजवले, दिग्पाल लांजेकरच्या नव्या सिनेमात मोठा बदल, चिन्मय मांडलेकर ऐवजी हा अभिनेता शिवरायांच्या भूमिकेत









