Elvish Yadav Firing: एल्विश यादवच्या घरावर कोणी आणि का केला गोळीबार? समोर येत 'या' गँगने घेतली जबाबदारी
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Elvish Yadav Firing: युट्युबर आणि बिग बॉस OTT विजेता एल्विश यादवच्या घरावर गोळीबार झाला. या घटनेनं सध्या सगळीकडे खळबळ उडाली आहे.
मुंबई : युट्युबर आणि बिग बॉस OTT विजेता एल्विश यादवच्या घरावर गोळीबार झाला. या घटनेनं सध्या सगळीकडे खळबळ उडाली आहे. गुरुग्राममधील त्याच्या घरी 10 ते 12 गोळ्या झाडल्या. धक्कादायक घटनेमागे नेमका कोणाचा हात आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. अशातच ‘हिमांशू भाऊ गँग’ने या गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे.
आता या गोळीबाराच्या घटनेची जबाबदारी अमेरिकेत लपून बसलेल्या हिमांशू भाऊ गँगने घेतली आहे. मात्र अद्याप याविषयी कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. फक्त सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टनुसार एल्विशच्या घरावर गोळीबार प्रकणात ‘हिमांशू भाऊ गँग’चा हात आहे.
यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजची चौकशी केली जात आहे. प्राथमिक तपासात हा दहशत पसरवण्यासाठी केलेला प्रयत्न असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
advertisement
दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, “घटनेनंतर सुरक्षा वाढवण्यात आली असून, या पोस्टचीही चौकशी केली जात आहे. सोशल मीडियावरील दाव्यांना आम्ही गांभीर्याने घेत आहोत. लवकरच आरोपींचा माग काढला जाईल.” एल्विश यादव याच्या चाहत्यांमध्ये या घटनेमुळे मोठी चिंता निर्माण झाली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर युट्युबरच्या सुरक्षिततेबद्दल काळजी व्यक्त केली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 17, 2025 12:14 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Elvish Yadav Firing: एल्विश यादवच्या घरावर कोणी आणि का केला गोळीबार? समोर येत 'या' गँगने घेतली जबाबदारी