Nitin Gadkari: 'शासकीय सेवेत आजकाल चपरासीसुद्धा...', प्रसाद ओकच्या प्रश्नांवर नितीन गडकरींचं भन्नाट उत्तर, VIDEO

Last Updated:

नुकतंच नागपूर येथे झालेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवात अभिनेता प्रसाद ओकने नितीन गडकरींना काही मनोरंजक आणि थेट प्रश्न विचारले, ज्यांची उत्तरं ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

News18
News18
मुंबई: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि कामामुळे नेहमीच चर्चेत असतात. नागपूरमध्ये नुकताच खासदार सांस्कृतिक महोत्सव पार पडला. २०१८ पासून गडकरी यांच्या पुढाकाराने आयोजित होणाऱ्या या महोत्सवात यावेळी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या खास सोहळ्यात अभिनेता प्रसाद ओकने नितीन गडकरींना काही मनोरंजक आणि थेट प्रश्न विचारले, ज्यांची उत्तरं ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

नागपूर की दिल्ली, वडापाव की तर्री पोहे?

प्रसाद ओकने गडकरींना त्यांच्या आवडीनिवडीबद्दल काही थेट प्रश्न विचारले, ज्यावर गडकरींनी अत्यंत साधेपणाने आणि स्पष्टपणे उत्तर दिले. यातील पहिला प्रश्न होता, जास्त प्रेम कशावर आहे – नागपूर की दिल्ली?, त्यावर गडकरी यांनी जराही वेळ न दवडता नागपूर असे म्हटले. पुढे प्रसादने विचारलं, वडापाव की तर्री पोहे? त्यावर गडकरी म्हणाले, तर्री पोहे!
advertisement
रस्ते मार्गाने गडकरी सध्या कोणत्या शहरात लवकर पोहोचतात, या प्रश्नावर गडकरी यांचे उत्तर ऐकून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. प्रसादने विचारलं, तुम्ही रस्ते मार्गाने दिल्लीला लवकर पोहोचता की मुंबईला? त्यावर गडकरी म्हणाले, आता मुंबईला लवकर पोहोचतो. गडकरींच्या या उत्तरावर प्रसाद ओकने कौतुक करत म्हटले, "काही वर्षांपूर्वी मुंबईला पोहोचणे खूप कठीण होते. पण आता साहेबांमुळे ते सोपे झाले आहे."
advertisement
advertisement

सरकारी सेवा आणि 'सफारी'चा किस्सा

प्रश्नमालिकेत पुढे गडकरींच्या वैयक्तिक आवडीनिवडीबद्दलही विचारणा करण्यात आली. प्रसादने विचारले तुमचं जास्त प्रेम कशावर आहे, सिनेमावर की नाटकावर? गडकरींनी उत्तर दिलं, नाटक! शेवटच्या प्रश्नावर मात्र गडकरींनी एक किस्सा सांगून सगळ्यांना हसवले. प्रसाद म्हणाला, तुम्ही सफारी घालणं पसंत करता की ब्लेझर? यावर गडकरी म्हणाले, ब्लेझर! यानंतर हसत हसत गडकरी म्हणाले, "शासकीय सेवेत आजकाल चपरासीसुद्धा सफारी परिधान करतात!" त्यांच्या या उत्तरावर प्रेक्षकांनी खूप दाद दिली.
advertisement
नितीन गडकरी यांच्या या खास आणि अनौपचारिक संवादाने नागपूरमधील हा सांस्कृतिक महोत्सवाला अधिकच रंगत आली.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Nitin Gadkari: 'शासकीय सेवेत आजकाल चपरासीसुद्धा...', प्रसाद ओकच्या प्रश्नांवर नितीन गडकरींचं भन्नाट उत्तर, VIDEO
Next Article
advertisement
Dharmendra News:  धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून,  हे खास गुपित!
धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित
  • धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित

  • धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित

  • धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित

View All
advertisement