प्रसिद्ध गायिका तिसऱ्यांदा झाली आई, 37 व्या वर्षी दिला मुलीला जन्म; पाहा PHOTO
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
संगीतविश्वातून एक गुडन्यूज समोर आलीय. प्रसिद्ध गायिका तिसऱ्यांदा आई बनली आहे. 37 व्या वर्षी तिने मुलीला जन्म दिलाय.
मुंबई : संगीतविश्वातून एक गुडन्यूज समोर आलीय. प्रसिद्ध गायिका तिसऱ्यांदा आई बनली आहे. 37 व्या वर्षी तिने मुलीला जन्म दिलाय. तिने बेबी झाल्यानंतर 12 दिवसांनी बाळासोबत फोटो शेअर करताच सोशल मीडियावर शुभेच्छा आणि आशिर्वादांचा वर्षाव होत आहे.
जगप्रसिद्ध पॉप स्टार रिहाना आई बनली आहे. तिने तिसऱ्या बाळाचे स्वागत केले आहे. 13 सप्टेंबर 2025 रोजी रिहाना आई बनली असून, तिने गोंडस मुलीला जन्म दिला. नुकतेच आपल्या मुलीचे पहिले फोटो सोशल मीडियावर शेअर केले. छोट्या बाळाने गुलाबी रंगाचा पोशाख घातलेला दिसतो. फोटोसोबतच रिहानाने गोंडस मिटन्सचा फोटोही पोस्ट केला आहे.
advertisement
रिहानाने मुलीचं नाव Rocki ठेवलं आहे. यामुळे रिहाना आणि रॉकी आता तीन मुलांचे पालक झाले आहेत. दोघांचे म्हणणे आहे की त्यांना त्यांच्या मुलांचे वय जवळजवळ सारखे असावे असे वाटते, जेणेकरून ते एकत्र वाढतील आणि घट्ट नाते निर्माण करतील.
advertisement
advertisement
2020 पासून एकत्र असलेले रिहाना आणि रॉकी यांनी 2022 मध्ये पहिल्या मुलाचे स्वागत केले. या मुलाचे नाव RZA ठेवण्यात आले. त्यानंतर 2023 मध्ये दुसऱ्या बाळाचा जन्म झाला, ज्याचे नाव Riot आहे. आता तिसऱ्या मुलीचे नाव Rocki ठेवेलं आहे. रिहाना आणि रॉकीवर मित्रपरिवार आणि चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, सोशल मीडियावर या लहानग्याच्या फोटोंना प्रचंड प्रेम मिळत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 25, 2025 11:40 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
प्रसिद्ध गायिका तिसऱ्यांदा झाली आई, 37 व्या वर्षी दिला मुलीला जन्म; पाहा PHOTO