'फोक आख्यान'च्या त्रीमूर्तींचं मोठ्या पडद्यावर पदार्पण! 'क्रांतिज्योती विद्यालय'मधील दमदार गाणं रिलीज, तुम्ही ऐकलं!
- Published by:Minal Gurav
Last Updated:
'द फोक आख्यान' च्या त्रीमूर्तींचं मोठ्या पडद्यावर पदार्पण झालं आहे. हर्ष-विजय आणि ईश्वर यांचं सिनेमातील पहिलं वहिलं गाणं रिलीज झालं आहे.
'क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम' हा सिनेमा नव्या वर्षात म्हणजेच 1 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी माध्यमातील शाळांची संस्कारमूल्ये, त्या शाळांनी घडवलेली पिढी आणि शिक्षकांनी दिलेला अमूल्य वारसा या सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित 'क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम' या सिनेमाची काही दिवसांआधीच घोषणा करण्यात आली. या सिनेमातील पहिलं गाणं रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्याच्या माध्यमातून 'द फोक आख्यान' च्या त्रीमूर्तींचं मोठ्या पडद्यावर पदार्पण झालं आहे. हर्ष-विजय आणि ईश्वर यांचं सिनेमातील पहिलं वहिलं गाणं रिलीज झालं आहे.
काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी 'क्रांतिज्योतीचे संगीत कारभारी' असे म्हणत 'द फोक आख्यान'च्या हर्ष-विजय आणि ईश्वर सोबत पाच दमदार गाणी चाहत्यांच्या भेटीला येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यातील पहिलं 'शाळा मराठी' हे शाळेची आठवण जागं करणारे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
advertisement
हर्ष–विजय यांचं संगीत आणि ईश्वर अंधारेनं हे गाणं लिहिलं आहे. मजेशीर शब्दांचा सुंदर मेळ आणि 12 वर्षांच्या रोहित जाधवनं आपल्या दमदार आवाजानं हे गाणं एका वेगळ्या उंचीवर नेलं आहे. रोहित हा छत्रपती संभाजीनगरचा असून गुरुवर्य अनाथाची माऊली रामेश्वरजी महाराज पवार यांच्या कीर्तन संस्थेत तो गेली सहा वर्षं शिक्षण घेत आहे. "एका छोट्या गावचा चिमुकला किर्तनकार या गाण्यातून त्याची कला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असल्याचा मला फार आनंद आहे. महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेला हे माझे विनम्र अभिवादन आहे", असं हेमंत ढोमे याचं म्हटलं आहे.
advertisement
तर आपल्या पहिल्या पदार्पणाविषयी आणि गाण्याविषयी बोलताना हर्ष-विजय म्हणाले, "शाळा मराठी’ हे गाणं करताना आम्हालाही पुन्हा एकदा आपल्या शाळेत गेल्यासारखे वाटले. मातृभाषेची आपुलकी, शिक्षकांचा स्पर्श आणि बालपणाची ऊर्जा आम्ही संगीतामध्ये जाणवून दिली आहे. हे गाणे ऐकताना प्रत्येकाला आपल्या शाळेच्या आठवणी ताज्या होतील आणि हीच आमची सर्वात मोठी कमाई आहे. आमचा हा पहिला चित्रपट आहे व या गाण्याचा प्रवास खूप अनोखा होता. हे गाणे करताना आम्ही सर्वांनीच खूप मजा केली. दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि निर्माती क्षिती जोग यांचे आम्ही आभारी आहोत; त्यांनी आम्हाला ही संधी दिली."
advertisement
'क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम' हा सिनेमा 1 जानेवारी 2026 रोजी रिलीज होणारआहे. या सिनेमात अभिनेते सचिन खेडेकर प्रमुख भूमिकेत आहेत. अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर, प्राजक्ता कोळी हे कलाकारही महत्त्वाच्या भुमिकेत आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 04, 2025 11:54 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'फोक आख्यान'च्या त्रीमूर्तींचं मोठ्या पडद्यावर पदार्पण! 'क्रांतिज्योती विद्यालय'मधील दमदार गाणं रिलीज, तुम्ही ऐकलं!


