Tejashri Pradhan : डोंबिवलीची तेजश्री प्रधान कशी बनली प्रत्येक मराठी मुलाची क्रश! 18 वर्ष करतेय तरुणांच्या मनावर राज्य
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Tejashri Pradhan : अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या वीण दोघांतली ही तुटेना मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेय तेजश्री प्रत्येक मराठी मुलाची क्रश आहे. डोंबिवलीची तेजश्री कशी बनली तरुणांची क्रश?
अभिनेत्री होण्यासाठी अनेक अभिनेत्री येतात आणि जातात. पण फार कमी अभिनेत्री अशा आहेत ज्या अभिनय क्षेत्रात आपली छाप उमटवतात आणि ती कायम ठेवतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळेच तेजश्री प्रधानचे फॅन्स आहेत. मुळची डोंबिवलीची असणारी तेजश्री प्रधान अभिनय क्षेत्रात आली आणि इथलीच झाली.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
इतक्या मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलेली तेजश्री तिच्या दोन कॅरेक्टर्समुळे प्रत्येक मराठी मुलाची क्रश बनली. त्यातील तिचं एक कॅरेक्टर म्हणजे जान्हवी. 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेत तेजश्रीनं साकारलेली जान्हवीची भूमिका सर्वाधिक लोकप्रिय झाली. जान्हवीमुळे तेजश्री महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. आजही जान्हवी प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.
advertisement
advertisement


