Sargun Mehta: 'गेल्या दोन वर्षांपासून मी...' प्रेग्नंसीबद्दल पहिल्यांदाच बोलली सरगुन मेहता, शेअर केली लांबलचक पोस्ट
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Sargun Mehta pregnancy : सोशल मीडियावर अचानक सरगुनच्या प्रेग्नन्सीच्या बातम्या वणव्यासारख्या पसरल्या. काही युजर्सनी तर चक्क तिचे बेबी बंपचे फोटो समोर आल्याचा दावाही केला.
मुंबई : टीव्ही आणि पंजाबी सिनेसृष्टीतील पॉवर कपल म्हणून ओळखले जाणारे सरगुन मेहता आणि रवी दुबे हे कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. पण गेल्या काही दिवसांपासून सरगुन एका वेगळ्याच आणि विचित्र कारणाने चर्चेत आली आहे.
सोशल मीडियावर अचानक सरगुनच्या प्रेग्नन्सीच्या बातम्या वणव्यासारख्या पसरल्या. काही युजर्सनी तर चक्क तिचे बेबी बंपचे फोटो समोर आल्याचा दावाही केला. मात्र, आता या सर्व चर्चांवर स्वतः सरगुनने मौन सोडलं असून, तिने ज्या पद्धतीने उत्तर दिलंय, त्यानंतर अफवा पसरवणाऱ्यांची बोलतीच बंद झाली आहे.
अफवा पसरवणाऱ्यांवर सरगुन संतापली
सरगुनने तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक लांबलचक पोस्ट शेअर करत या अफवांचा समाचार घेतला. सरगुन म्हणाली, "मीडिया आणि सोशल मीडियाला कदाचित माझ्या प्रेग्नन्सीबद्दल माझ्या आधीच माहिती असतं. त्यांच्या मते तर मी गेल्या दोन वर्षांपासून प्रेग्नंट आहे. पण इतकी लांब प्रेग्नन्सी कोणाची असते का? जरा शांत व्हा आणि अशा बिनबुडाच्या बातम्या पसरवणं बंद करा." सरगुनच्या या उत्तराने सोशल मीडियावर एकच हशा पिकला आहे.
advertisement
advertisement
बातम्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरगुन पुढे लिहिते, "एखादी बातमी छापण्यापूर्वी किमान आम्हाला किंवा आमच्या टीमला विचारणं इतकं अवघड आहे का? आता काय सॅलूनमध्ये जाणं किंवा कॅफेमध्ये कॉफी प्यायला जाणं म्हणजे प्रेग्नन्सी मानली जाते का? या अफवांमधील मुलं कुठे जात आहेत आणि मी त्यांना इतक्या लवकर जन्म कशी देतेय, हे मलाच समजत नाहीये." तिने स्पष्ट केलं की, स्वतः रवी आणि तिलाच या काल्पनिक प्रेग्नन्सीबद्दल काहीही माहिती नाही.
advertisement

सोशल मीडिया पोस्ट तुफान व्हायरल
सरगुन आणि रवी हे इंडस्ट्रीतील सर्वात बिझी कपल्सपैकी एक आहेत. दोघेही सध्या आपल्या नवनवीन प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र आहेत. अशा वेळी कोणाच्याही वैयक्तिक आयुष्याबद्दल अशी चुकीची माहिती पसरवणं हे अत्यंत चुकीचं असल्याचं तिने म्हटलं आहे. "कोणाच्याही खासगी आयुष्याबद्दल अटकळ बांधण्यापूर्वी सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करा," अशी विनंती तिने आपल्या चाहत्यांना आणि प्रसारमाध्यमांना केली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 21, 2026 7:46 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Sargun Mehta: 'गेल्या दोन वर्षांपासून मी...' प्रेग्नंसीबद्दल पहिल्यांदाच बोलली सरगुन मेहता, शेअर केली लांबलचक पोस्ट









