प्रसिद्ध मॉडेलचं गंभीर आजारानं अवघ्या 26 व्या वर्षी निधन; मिस वर्ल्ड स्पर्धेतही घेतला होता सहभाग

Last Updated:

मनोरंजन विश्वातून एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. माजी मिस वर्ल्ड स्पर्धक शेरीका डी आर्मासचं निधन झालं आहे.

माजी मिस वर्ल्ड स्पर्धक शेरीका डी आर्मास
माजी मिस वर्ल्ड स्पर्धक शेरीका डी आर्मास
मुंबई, 16 ऑक्टोबर :   मनोरंजन विश्वातून एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. माजी मिस वर्ल्ड स्पर्धक शेरीका डी आर्मासचं निधन झालं आहे. तिने 2015 मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेत उरुग्वेचे प्रतिनिधित्व केले होते. शेरीका डी अरमासने वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. न्यूयॉर्क पोस्टमधील वृत्तानुसार, शेरिका डी अरमास गर्भाशयाच्या कर्करोगाशी झुंज देत होती. पण 13 ऑक्टोबर रोजी वयाच्या 26 व्या वर्षी तिची झुंज अपयशी ठरली आहे. डी आर्मासचे कॅन्सरवरील उपचार चालू होते, तिने केमोथेरपी आणि रेडिओथेरपी उपचार देखील घेतले. पण या गंभीर आजारातून ती वाचू शकली नाही.
शेरीका डी अरमासच्या निधनाच्या बातमीने तिच्या चाहत्यांना धक्का बसला असून उरुग्वे आणि जगभरात शोककळा पसरली आहे. तिचा भाऊ मायाक डी अरमासने तिच्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्याने आपल्या लाडक्या बहिणीसाठी लिहिलंय की, "आता उंच उंच उडत राहा... माझी लहान बहीण." मिस युनिव्हर्स उरुग्वे 2022 कार्ला रोमेरो यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी 'मिस डी आर्मास मी आजपर्यंत भेटलेल्या सर्वात सुंदर महिलांपैकी ती एक होती." अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
advertisement
Urvashi Rautela : भारत-पाक मॅच पाहायला गेलेल्या उर्वशी रौतेलाला लाखोंचा चुना; अभिनेत्रीसोबत घडलं असं काही
2015 मध्ये चीनमध्ये झालेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेत 26 वर्षीय शेरीका डी अरमास पहिल्या 30 मध्ये नव्हती. ती या स्पर्धेत स्पर्धा करण्यासाठी फक्त सहा 18 वर्षांच्या मुलींपैकी एक होती. त्यावेळी नेट उरुग्वेला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, "मला नेहमीच मॉडेल व्हायचे होते, मग ते सौंदर्य मॉडेल असो, जाहिरात मॉडेल असो किंवा कॅटवॉक मॉडेल असो. मला फॅशनशी संबंधित प्रत्येक गोष्ट आवडते आणि मला वाटते की सौंदर्य स्पर्धांमध्ये, मिस युनिव्हर्समध्ये सहभागी होण्याची संधी मिळणे हे कोणत्याही मुलीचे स्वप्न असते. आव्हानांनी भरलेला हा अनुभव मला जगता आल्याने मला खूप आनंद होत आहे.''
advertisement
डी आर्मासने तिची स्वतःची मेकअप लाइन देखील सुरू केली
तिने स्वतःची मेक-अप लाइन देखील सुरू केली होती. शे डी आर्मास स्टुडिओ नावाने ती मेकअपशी संबंधित उत्पादने विकायची. एवढंच नाही तर ही मॉडेल पेरेझ स्क्रॅमिनी फाऊंडेशन सोबत देखील काम करायची. हे फाउंडेशन जे कर्करोगाने पीडित मुलांवर उपचार करते. त्यामुळे आता डी आर्मासच्या निधनाने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
प्रसिद्ध मॉडेलचं गंभीर आजारानं अवघ्या 26 व्या वर्षी निधन; मिस वर्ल्ड स्पर्धेतही घेतला होता सहभाग
Next Article
advertisement
Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement