Santosh Juvekar: 'ज्या गोष्टीची गरज आहे...' गणपतीचं आगमन अन् मराठी इंडस्ट्रीविषयी काय बोलला संतोष जुवेकर?

Last Updated:

santosh juvekar: सर्वत्र गणेशोत्सवाचं वातावरण आहे. आनंद, जल्लोष आणि पॉझिटिव्ह वातावरण पाहायला मिळत आहे. अनेकांच्या घरी लाडक्या बाप्पाचं आगमन झालं आहे.

मराठी इंडस्ट्रीविषयी काय बोलला संतोष जुवेकर?
मराठी इंडस्ट्रीविषयी काय बोलला संतोष जुवेकर?
अजित मांढरे, मुंबई: सर्वत्र गणेशोत्सवाचं वातावरण आहे. आनंद, जल्लोष आणि पॉझिटिव्ह वातावरण पाहायला मिळत आहे. अनेकांच्या घरी लाडक्या बाप्पाचं आगमन झालं आहे. अशातच मराठी अभिनेता संतोष जुवेकरच्या घरीही गणपती बाप्पाचं आगमन झालंय. यावेळी त्याने बाप्पाकडे मराठी इंडस्ट्रीसाठी आणि लोकांच्या सकारात्मकतेसाठी प्रार्थना केली. अभिनेता नेमकं काय म्हणाला? याविषयी जाणून घेऊया.
यंदा संतोष जुवेकरच्या घरी 100 टक्के इकोफ्रेंडली गणपती बाप्पा बसवण्यात आला आहे. आज अभिनेता संतोष जुवेकर याने त्याच्या कळव्यातील घरी परंपरेनुसार गणपती बाप्पा स्थापना केलीये. बाजूने कागदाचं डेकोरेशन बनवण्यात आलं आहे. ज्यामुळे आणखीनच जीव आलाय. संतोषने गणपती बाप्पांसोबत खूप वेगळं कनेक्शन असल्याचंही सांगितली.
advertisement
न्युज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये संतोष जुवेकर म्हणाला, गणपती येण्याअगोदर कामाला सुरुवात होते, घराची साफ सफाई असेल, डेकोरेशन अशी सुरुवात होते. प्रत्येक वेळेला बाप्पा सोबत असतो. बापाचा आशिर्वाद आणि आई वडिलांचा आशिर्वादाने कामाच्या संधी मिळत असतात त्या अशाच मिळत राहो.
संतोष जुवेकरने सगळ्यांसाठी साकडं मागितलं, सगळ्यांना सुखी ठेव, सकारात्मकता जास्त वाढू दे, आदर असू दे. चांगल्या गोष्टीची जाणीव सगळ्यांना असूदेत. यावेळी संतोष मराठी इंडस्ट्रीविषयीदेखील बोलला. "मराठी इंडस्ट्रीची साऊथ आणि हिंदी सारखी वाढ होऊ दे. मराठीला दर्जा आहेच पण मराठी इंडस्ट्रीला ज्या गोष्टी गरज आहे ती पूर्ण होऊ दे."
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Santosh Juvekar: 'ज्या गोष्टीची गरज आहे...' गणपतीचं आगमन अन् मराठी इंडस्ट्रीविषयी काय बोलला संतोष जुवेकर?
Next Article
advertisement
BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement