Girish Oak : मुंबई-पुणे प्रवास, कंडक्टरने जुळवली जोडी, पहिल्या घटस्फोटानंतर 'अशी' सुरू झाली गिरीश ओक यांची लव्हस्टोरी!

Last Updated:

Girish Oak Second Marriage Story : अतिशय नाट्यमय रीतीने डॉ. गिरीश ओक यांचं लग्न झालं होतं. नुकतचं 'आम्ही सारे खवय्ये' या कार्यक्रमात त्यांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे.

News18
News18
Girish Oak Second Marriage Story : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते डॉ. गिरीश ओक यांचा 'बिन लग्नाची गोष्ट' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दरम्यान त्यांनी नुकतीच संकर्षण कऱ्हाडेच्या 'आम्ही खारे खवय्ये' या कार्यक्रमात पत्नी पल्लवीसोबत हजेरी लावली. यादरम्यान वेगवेगळ्या रेसिपी बनवत असताना त्यांनी आपल्या दुसऱ्या लग्नाचा किस्सा शेअर केला. अतिशय नाट्यमयरित्या गिरीश ओक यांचं दुसरं लग्न झालं होतं. घरच्यांचा विरोध असताना गिरीश ओक यांनी पल्लवीसोबत संसार थाटला होता.
advertisement
डॉ. गिरीश ओक आणि पल्लवी यांची पहिली भेट पुणे- मुंबई प्रवासादरम्यान झाली होती. पल्लवी या अगोदरच बसमध्ये बसलेल्या होत्या. कर्वेनगरला बस आल्यानंतर गिरीश ओक गाडीत बसले होते. पुढे मागे अशी सिट असताना कंडक्टरने त्यांना जवळजवळ बसण्यास सांगितले. अर्थात ओळख नसल्याने या दोघांमध्ये काहीच बोलणे झाले नाही. मात्र आपल्याजवळ डॉ. गिरीश ओक बसलेत ही बाब पल्लवी यांनी त्यांच्या मैत्रिणीला फोनवर सांगितली. बसमधून उतरल्यानंतर पल्लवी यांनी गिरीश ओक यांना त्यांचा फोन नंबर विचारला आणि त्यांनी तो दिलाही. पुढे या दोघांची ओळख वाढली आणि या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले.
advertisement
पल्लवी यांच्या आईवडिलांचा मात्र या लग्नाला विरोध होता. त्यांना हे लग्न मान्य नव्हतं. गिरीश ओक अगोदरच विवाहित होते त्यांना गिरीजा ही मुलगीही होती. घरच्यांचा विरोध असताना नाट्यमय रीतीने 2008 मध्ये अखेर गिरीश ओक आणि पल्लवी यांनी संसार थाटला. आम्ही सारे खवय्येमध्ये संकर्षण कऱ्हाडेला सांगताना पल्लवी म्हणतात की,"अतिशय नाट्यमय रीतीने झालेलं आमचं हे लग्न"...याचा उलगडा करताना गिरीश ओक म्हणतात की," हो , म्हणजे विरोधात जाऊन आमचं लग्न झालं होतं. कारण तिच्या आईवडिलांना ते मान्य नव्हतं...पण आता सगळ्या गोष्टी बदलल्या आहेत आणि त्या सगळ्यांना मी आपलंसं करून घेतलं आहे."
advertisement
डॉ. गिरीश ओक यांनी छोट्या पडद्यासह रुपेरी पडदा चांगलाच गाजवला आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर त्यांचा 'बिन लग्नाची गोष्ट' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात प्रिया बापट आणि उमेश कामत या जोडीसह निवेदिता सराफही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अतीशय भावनात्मक असणारा हा चित्रपट आहे.
advertisement
मराठी बातम्या/मनोरंजन/
Girish Oak : मुंबई-पुणे प्रवास, कंडक्टरने जुळवली जोडी, पहिल्या घटस्फोटानंतर 'अशी' सुरू झाली गिरीश ओक यांची लव्हस्टोरी!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement