Hema Malini: "पुरस्कार आणखीन लवकर मिळाला असता तर..." धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्कार; हेमा मालिनींकडून खंत व्यक्त
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभुषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री, धर्मेंद्र यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांना सुद्धा मरणोत्तर पद्मविभुषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. धर्मेंद्र यांना पद्मविभुषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री, धर्मेंद्र यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. धर्मेंद्र यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रचंड आनंद आणि अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. फक्त देओल कुटुंबीयांसाठीच नाही तर, संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत. हेमा मालिनी यांनी एएनआयसोबत बोलतना ही प्रतिक्रिया दिली आहे.
एएनआय वृत्तसंस्थेसोबत बोलताना हेमा मालिनी म्हणाल्या की, "हा सन्मान केवळ देओल कुटुंबासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी आनंदाचा क्षण आहे. यामुळे आम्हाला खूप आनंद होतोय. यामुळे संपूर्ण देश आनंदी आहे. जर हा पुरस्कार आणखीन लवकर मिळाला असता, तर धर्मेंद्र यांनाही आनंद झाला असता. तसंच त्यांचे अनेक चाहतेसुद्धा यामुळे खुश झाले असते." दरम्यान, ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांना भारत सरकारकडून कला क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेत मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
advertisement
बॉलिवूडचे 'ही-मॅन' धर्मेंद्र यांचे 24 नोव्हेंबर 2025 रोजी वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी सहा दशकांहून अधिक काळ रुपेरी पडद्यावर दमदार अभिनय केला. धर्मेंद्र यांचा 'इक्कीस' हा शेवटचा चित्रपट जानेवारी 2026 मध्ये प्रदर्शित झाला. धर्मेंद्र यांनी 'शोला और शबनम', 'अनपढ', 'शादी', 'बंदिनी', 'फुल और पत्थर', 'मेरा नाम जोकर'सारख्या चित्रपटांतून चाहत्यांचे खळखळून मनोरंजन केले. 'ड्रीम गर्ल', 'सीता और गीता', 'चुपके चुपके' या चित्रपटांतल्या त्यांच्या भूमिकाही विशेष गाजल्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 02, 2026 7:34 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Hema Malini: "पुरस्कार आणखीन लवकर मिळाला असता तर..." धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्कार; हेमा मालिनींकडून खंत व्यक्त






