मनोरंजन विश्वात खळबळ! प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीचा मृत्यू, हॉटेल रुममध्ये सापडला मृतदेह
- Published by:Minal Gurav
Last Updated:
एका प्रसिद्ध अभिनेत्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्याच्या मुलीचं निधन झालं आहे. एक हॉटेल रुममध्ये अभिनेत्याची मुलगी मृतावस्थेत आढळली आहे.
सर्वत्र नवीन वर्षाचा उत्साह आहे. नव्या वर्षाचं स्वागत करत सगळे सेलीब्रेशन करत आहेत. अशातच मनोरंजन विश्वातून हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता अर्जुन बिजलानी याच्या बायकोच्या वडिलांचं म्हणजेच त्याच्या सासऱ्याचं निधन झाल्याची माहिती समोर आली होती. अर्जुन बिजलानीच्या सासऱ्याच्या निधनाची माहिती ताजी असतानाच आणखी एखा अभिनेत्याने त्याची अत्यंत जवळची व्यक्ती गमावली आहे.
एका प्रसिद्ध अभिनेत्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्याच्या मुलीचं निधन झालं आहे. एक हॉटेल रुममध्ये अभिनेत्याची मुलगी मृतावस्थेत आढळली आहे. या घटनेनं अभिनेत्याला खूप मोठा धक्का बसला आहे. त्याच्या कुटुंबावरही मोठा आघात झाला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
advertisement
प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता टॉमी जोन्सची मुलगी विक्टोरिया जोन्स आज या जगात नाही. एका लग्झरी हॉटेलमध्ये ती मृतावस्थेत आढळली. गुरुवारी मध्यरात्री 3.14 मिनिटांनी तिचा मृतदेह सापडला. NCB हे एरियाच्या माहितीनुसार, गुरुवारी सन फ्रॉन्सिक्सोच्या फेयरमोन्ट हॉटेलमध्ये अभिनेत्याची मुलगी सापडली. तिला रुग्णालयात दाखव केलं असं डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

advertisement
TMZ त्या रिपोर्टनुसार, पीडित विक्टोरिया ही 34 वर्षांची होती. ती ऑस्कर विजेता अभिनेता टॉमी जोन्सची मुलगी होती. तिच्या मृत्यूनंतर एकच खळबळ उडाली आहे. तिचा मृत्यू कसा झाला याचा पोलीस तपास करत आहेत. दरम्यान अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. काही रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याच्या मुलीने आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. मात्र याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
advertisement
विक्टोरिया हिनं वडिलांसमोर मेन इन ब्लॅक 2 मध्ये काम केलं आहे. ती 34 वर्षांची होती. पण नेहमीच लाइमलाइटपासून दूर राहिली. तिची वडिल टॉमी हे आता 79 वर्षांचे आहेत. त्यांनी आतापर्यंत अंडर सेज, नॅच्युरल बॉर्न किलर्स, द क्लाइंट ओ बॅटमॅन फॉरएवर सारख्या सिनेमांत काम केलं आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 02, 2026 1:07 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
मनोरंजन विश्वात खळबळ! प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीचा मृत्यू, हॉटेल रुममध्ये सापडला मृतदेह








