52 वर्षीय मलायका अरोराच्या वल्गर फोटोंमुळे तुफान राडा! अश्लील डान्स करण्याबाबत अभिनेत्रीचं स्पष्टीकरण
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Malaika Arora Honey Singh Music Video : ५२ वर्षीय मलायकाने 'चिलगम' या गाण्यात केलेल्या डान्स स्टेप्स अश्लीलतेच्या मर्यादा ओलांडत असल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे, ज्यामुळे हे गाणे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
मुंबई : रॅपर यो यो हनी सिंगचे नुकतेच रिलीज झालेले 'चिलगम' हे गाणे सध्या प्रचंड गाजत आहे, पण त्यापेक्षा जास्त चर्चा होत आहे ती या गाण्यात डान्स करणारी अभिनेत्री मलायका अरोराची. ५२ वर्षीय मलायकाने या गाण्यात केलेल्या डान्स स्टेप्स अश्लीलतेच्या मर्यादा ओलांडत असल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे, ज्यामुळे हे गाणे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
'चिलगम' हे गाणे हनी सिंगच्या आगामी म्युझिक अल्बम 51 Glorious Days चा भाग आहे. गाणे रिलीज होताच, त्याला प्रचंड व्ह्यूज मिळत असले तरी, या गाण्यामुळे मलायका युजर्सच्या थेट निशाण्यावर आली आहे.
वल्गर बीटीएस फोटोंमुळे राडा
'चिलगम' म्युझिक व्हिडिओमध्ये मलायका अरोरा हनी सिंगसोबत बोल्ड डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. या दोघांमधील केमिस्ट्रीही चांगली जमली आहे, पण युजर्सना गाण्यात बोल्डनेसची अतिशयोक्ती फारशी रुचलेली नाही. रेडिटवर व्हायरल झालेल्या एका बीटीएस फोटोमध्ये मलायका काहीसे अश्लील हावभाव करताना दिसत आहे. हा फोटो मजामस्तीमध्ये काढलेला असला तरी, सोशल मीडियावर तिला चांगलंच ट्रोल केलं जात आहे.
advertisement
एका युजरने थेट लिहिले, "मलायका निक्की मिनाजसारखे का वागत आहे?" तर दुसऱ्या एका युजरने टीका केली, "वयाचा मुद्दा नाहीये, पण यात ती चीप आणि वल्गर दिसत आहे." या वाद आणि ट्रोलिंगच्या पार्श्वभूमीवर मलायका अरोराने आपली बेधडक प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
गाण्यातील अश्लीलतेमुळे होणाऱ्या ट्रोलिंगवर मलायकाने IANS ला सांगितले की, हनी सिंगसोबत काम करणे अत्यंत मजेशीर होते. यो यो हनी सिंगची एनर्जी इतकी जबरदस्त आहे की सेटवर त्याच्या वाइबशी जुळवून घेणे अवघड होते." तिने 'चिलगम' या म्युझिक व्हिडिओला बोल्ड म्हटले आहे. मलायका म्हणाली, "हे गाणं तुमचा मूड लगेचच सेट करेल. त्यामुळे मला पडद्यावर माझी बेफिकीर बाजू दाखवण्याची संधी मिळाली. प्रेक्षकांनाही ती ऊर्जा जाणवेल."
advertisement
वाद वाढला, पण व्ह्यूज थांबले नाहीत
यापूर्वी मलायकाच्या स्टाईल आणि एलिगन्सला नेहमीच चाहत्यांची दाद मिळाली आहे. पण या गाण्यातील तिचे रूप पाहून सर्वांनाच शॉक बसला आहे. दरम्यान, टीका आणि नकारात्मक कमेंट्स असूनही 'चिलगम' गाण्याची लोकप्रियता मात्र वाढतच आहे. रिलीजच्या अवघ्या ९ तासांतच गाण्याने १० मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. एका बाजूला वाद सुरू असला तरी, गाण्याने प्रेक्षकांना वेड लावलं आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 09, 2025 6:48 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
52 वर्षीय मलायका अरोराच्या वल्गर फोटोंमुळे तुफान राडा! अश्लील डान्स करण्याबाबत अभिनेत्रीचं स्पष्टीकरण


