JayaPrada Net Worth : 10 रूपये होतं पहिलं मानधन, आज कोटी रूपयांची मालकीण आहे अभिनेत्री जया प्रदा

Last Updated:

जया प्रदा यांच्याकडे बक्कळ संपत्ती आणि पैसा आहे. त्यांची संपत्ती किती आहे पाहूयात.

कोटी रूपयांची मालकीण आहे अभिनेत्री जया प्रदा
कोटी रूपयांची मालकीण आहे अभिनेत्री जया प्रदा
मुंबई, 28 डिसेंबर :  उत्तर प्रदेशच्या रामपुर येथील माजी खासदार आणि अभिनेत्री जया प्रदा यांना ओळखत नाही असे फार कमी लोक असतील. जया प्रदा यांनी बॉलिवूडमध्ये 80चा काळ गाजवला होता. बॉलिवूडच्या अनेक मोठ्या अभिनेत्यांबरोबर त्यांनी काम करत सिल्वर स्क्रिनवर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. पण बॉलिवूड सोडून जया प्रदा यांनी राजकारणाचा रस्ता निवडला आणि त्या क्षणोक्षणी अडचणीत सापडत गेल्या. आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशमधील खासदार-आमदार कोर्टाने जया प्रदा यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे. उत्तर प्रदेश पोलीस जया प्रदा यांचा शोध घेत आहेत.
जया प्रदा यांनी 2004 साली समाजवादी पार्टीच्या तिकिटावर रामपुरमध्ये खासदारकीसाठी उभ्या राहिल्या आणि जिंकल्या. पण 2019मध्ये त्यांनी समाजवादी पक्षाला रामराम करत भाजपचा झेंडा हाती घेतला. जया प्रदा यांच्याकडे बक्कळ संपत्ती आणि पैसा आहे. त्यांची संपत्ती किती आहे पाहूयात.
advertisement
जया प्रदा यांना पहिल्यापासून डान्सची प्रचंड आवड होती. 14व्या वर्षी त्यांनी शाळेत डान्स केला होता तेव्हा एका तेलुगू दिग्दर्शकानं त्यांना पाहिलं आणि भूमि कोसम या सिनेमात डान्स करण्याची ऑफर दिली. या सिनेमात 3 मिनिटांच्या गाण्यावर डान्स करण्यासाठी जया प्रदा यांना 10 रूपये मानधन मिळालं होतं.
2019 मध्ये त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात जयाप्रदा यांनी सांगितले होते की, त्यांचं एकूण उत्पन्न सुमारे 31 लाख 29 हजार रुपये आहे. त्यांची एकूण संपत्ती 9 कोटी 27 लाखू रूपये असून, त्यांच्याकडे साडेचार लाख रूपयांची कॅश आहे.
advertisement
advertisement
जया प्रदा यांचे, गुडगाव, चेन्नई, मुंबई, हैद्राबाद सारख्या शहरात काही घर आहे. प्रतिज्ञापत्रानुसार जयाप्रदा यांच्याकडे दोन किलो सोने आणि दीड किलो चांदी होती. त्यांची एकूण स्थावर मालमत्ता 18.65 कोटी रूपये आहे. तरीही त्या 1.55 कोटींच्या कर्जात बुडाल्या आहेत.
इतकंच नाही तर त्या महागड्या गाड्यांच्याही शॉकिन आहेत. त्यांच्याकडे Mercedes Benz, Outlender, Ford Endeavor, Ford Ikon आणि Xylo Mahindra सारख्या लग्झरी गाड्या आहेत. यातील प्रत्येक गाडीची किंमत लाखांच्या घरात आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
JayaPrada Net Worth : 10 रूपये होतं पहिलं मानधन, आज कोटी रूपयांची मालकीण आहे अभिनेत्री जया प्रदा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement