लग्नाआधी नवऱ्यासोबत असं काय करतेय कोकण हार्टेड गर्ल? व्हिडिओ शेअर करताच मिळालेत 2M व्ह्यूज
- Published by:Minal Gurav
Last Updated:
ankita walawalkar new video : लग्नाच्या आधी मात्र कोकण हार्टेड गर्लने एक व्हिडिओ शेअर केला आहे. लग्नाआधी ती जे करतेय ते पाहून सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मुंबई : बिग बॉस मराठी सीझन 5 ची स्पर्धक कोकण हार्टेड गर्ल प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर अंकिताने तिच्या होणाऱ्या नवऱ्याची ओळख सर्वांना करून दिली होती. अंकिता पुढील काही दिवसात लग्न करतेय. तिच्या लग्नाची पत्रिका देखील छापण्यात आली आहे. लग्नाच्या आधी मात्र कोकण हार्टेड गर्लने एक व्हिडिओ शेअर केला आहे. लग्नाआधी ती जे करतेय ते पाहून सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अंकिता वालावलकर आणि तिचा नवरा लग्नाआधी त्यांच्या फिटनेसवर मेहनत घेताना दिसत आहेत. लग्नाला काही दिवस उरलेले असताना अंकिता आणि तिचा नवरा जीममध्ये घाम गाळताना दिसत आहेत. अंकिताने जीम लावली असून ती नवऱ्याबरोबर दररोज जीमला जातेय. जीममधील व्हिडिओ तिने शेअर केलेत. ज्या व्हिडिओला अल्पावधीत 2 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.
advertisement
अंकिताने जीममधील व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात ती जीममधील वेगवेगळ्या इक्विपमेंट्सचा वापर करून व्यायाम करताना दिसतेय. तिच्या नवऱ्याबरोबर डंबेल्स घेऊन स्कॉट मारतेय तर लेग्स एक्सरसाइज करताना तिच्या नाकीनऊ आल्याचंही पाहायला मिळतंय.
advertisement
“जीम आणि मी” असं म्हणत अंकिताने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला 2 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अंकिताला असं जीममध्ये पाहून चाहत्यांनी तिची खिल्ली उडवलीये. एका चाहत्याने लिहिलंय, “कित्या गो जीवाचे हाल करतस असस ता बरा अस्स्स छान दिसतेस.” दुसऱ्या चाहत्यानं लिहिलंय, “तुला गरज काय आहे जीमची.”
advertisement
अंकिताच्या घरी लग्नाची घाई सुरू आहे. अंकिताने देवाच्या पत्रिकेचे फोटो शेअर केले होते. फेब्रुवारी महिन्यात अंकिता आणि तिचा नवरा लग्न करणार आहेत. अंकिताचा नवरा हा मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध संगीतकार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 31, 2024 12:37 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
लग्नाआधी नवऱ्यासोबत असं काय करतेय कोकण हार्टेड गर्ल? व्हिडिओ शेअर करताच मिळालेत 2M व्ह्यूज