Punha Shivajiraje Bhosle : प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला, महेश मांजरेकर म्हणाले, 'छत्रपती असते तर आज....'
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
बहुप्रतिक्षित चित्रपट "पुन्हा शिवाजीराजे भोसले" येत्या ३१ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रदर्शनापूर्वी, मांजरेकर आणि त्यांच्या चित्रपटातील कलाकारांनी शिर्डी येथे साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत, चित्रपटाच्या यशासाठी आशीर्वाद मागितले.
हरीष दिमोटे, प्रतिनिधी अहिल्यानगर : 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या गाजलेल्या चित्रपटाने मराठी माणसाची अस्मिता जागृत करणारे दिग्दर्शक महेश मांजरेकर आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना मांडण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट "पुन्हा शिवाजीराजे भोसले" येत्या ३१ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रदर्शनापूर्वी, मांजरेकर आणि त्यांच्या चित्रपटातील कलाकारांनी शिर्डी येथे साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत, चित्रपटाच्या यशासाठी आशीर्वाद मागितले.
साईसमाधीवर पोस्टर ठेवून केली प्रार्थना
मांजरेकर आणि त्यांच्या टीमने शिर्डीच्या साईमंदिरात जाऊन साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी चित्रपटाचे पोस्टर साईंच्या समाधीवर ठेवून, शेतकऱ्यांच्या या कहाणीला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळावा यासाठी प्रार्थना केली.
advertisement
यापूर्वी 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. पण यावेळी मांजरेकर एका अधिक गंभीर आणि संवेदनशील विषयाला हात घालत आहेत.
केवळ मनोरंजन करणं हे चित्रपटाचं उद्दिष्ट नाही
"पुन्हा शिवाजीराजे भोसले" या चित्रपटाचे कथानक अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाभोवती फिरते ते म्हणजे 'आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते, तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि हाल पाहून त्यांना काय वाटले असते?'
advertisement
advertisement
साई दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना बोलताना महेश मांजरेकर यांनी स्पष्ट केले की, "हा सिनेमा केवळ मनोरंजनासाठी नाही, तर महाराष्ट्राच्या मातीशी नाळ जोडलेल्या आणि या मातीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाला विचार करायला भाग पाडणारा हा चित्रपट आहे."
सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत शेतकऱ्यांचे प्रश्न किती गंभीर आहेत आणि त्याकडे समाजाचे लक्ष वेधण्यासाठी हा चित्रपट एक दर्पण म्हणून काम करेल, असा विश्वास मांजरेकर यांनी यावेळी व्यक्त केला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 16, 2025 3:43 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Punha Shivajiraje Bhosle : प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला, महेश मांजरेकर म्हणाले, 'छत्रपती असते तर आज....'