Mahhi Vij: 'जयच्या संमतीनेच मी...', ट्रोल करणाऱ्यांवर अभिनेत्रीचा संताप, दिला शाप देत म्हणाली 'तुम्ही नीच लोक, नरकात जाल'
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Mahhi Vij: माहीची लेक तारा नदीमला चक्क 'अब्बा' म्हणते, हे समोर आल्यावर सोशल मीडियावर घाणेरड्या कमेंट्सचा पूर आला. अखेर या सर्व प्रकरणावर गप्प न बसता माहीने एक व्हिडिओ शेअर करत ट्रोलर्सची चांगलीच झडती घेतली आहे.
मुंबई: टीव्ही विश्वातील प्रसिद्ध जोडी जय भानुशाली आणि माही विज यांच्या घटस्फोटाची बातमी ताजी असतानाच, आता एका नव्या वादाने तोंड वर काढलं आहे. १५ वर्षांचा संसार मोडल्यानंतर माहीने तिचा जिवलग मित्र नदीम याच्या वाढदिवसानिमित्त एक भावूक पोस्ट शेअर केली. इतकंच नाही, तर माहीची लेक तारा नदीमला चक्क 'अब्बा' म्हणते, हे समोर आल्यावर सोशल मीडियावर घाणेरड्या कमेंट्सचा पूर आला. अखेर या सर्व प्रकरणावर गप्प न बसता माहीने एक व्हिडिओ शेअर करत ट्रोलर्सची चांगलीच झडती घेतली आहे.
माही विजने आपल्या व्हिडिओमध्ये अत्यंत संतप्त भाषेत प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणते, "मला अनेक जणांनी सांगितलं की याकडे दुर्लक्ष कर, पण आता पाणी डोक्यावरून गेलंय. ज्या लोकांनी माझ्या आणि नदीमच्या नात्याबद्दल फालतू चर्चा सुरू केली आहे, त्यांना लाज वाटली पाहिजे. तुम्ही एका पवित्र शब्दाला आणि नात्याला घाणेरड्या नजरेतून पाहत आहात. तुम्ही 'अब्बा' या शब्दाचा अर्थच बदलून टाकला आहे."
advertisement
जयसोबत मिळून घेतलेला निर्णय
माही पुढे म्हणाली की, "जेव्हा मी आणि जय एकत्र होतो, तेव्हाच आम्ही दोघांनी मिळून हा निर्णय घेतला होता की तारा नदीमला 'अब्बा' म्हणेल. हे काही आजचं गुपित नाहीये. नदीम गेल्या ६ वर्षांपासून माझ्या कुटुंबाचा भाग आहे आणि तो कायम राहील."
करण सोनावणेने लावली काडी, पहिल्याच दिवशी घरात महाभारत! तन्वी आणि रुचितामध्ये जुंपली, नेमकं काय घडलं?
advertisement
जय आणि माहीने अत्यंत समंजसपणा दाखवत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. यावर बोट ठेवत माही म्हणाली, "आम्ही परस्पर संमतीने वेगळे झालो, हे कदाचित लोकांना सहन होत नाहीये. तुम्हाला फक्त घाण आणि नकारात्मकता पसरवायची असते. नदीम माझा बेस्ट फ्रेंड आहे आणि माझ्या कठीण काळात त्याने मला सावरलंय. आम्ही वेगळे झालो म्हणजे लगेच माझ्या चारित्र्यावर संशय घ्यायचा, ही तुमची वृत्ती अत्यंत नीच आहे."
advertisement
advertisement
रागाच्या भरात माहीने ट्रोलर्सना दिला शाप
ट्रोल्सवर आपला राग काढताना माहीने शापवजा शब्दांत सुनावलं. ती म्हणाली, "जे लोक सोशल मीडियावर बसून दुसऱ्याच्या आयुष्याबद्दल वाट्टेल ते बोलतात, अशा लोकांवर मी थुंकते. लक्षात ठेवा, कर्माची फळं इथेच भोगावी लागतात. तुम्ही लोक नरकात जाल आणि तुमच्यासाठी नरक आता लांब नाहीये."
काय आहे नेमकं प्रकरण?
advertisement
गेल्या शनिवारी नदीमच्या वाढदिवशी माहीने ताराच्या इन्स्टाग्रामवरून एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये ताराने नदीमला 'अब्बा' म्हटलं होतं. जय भानुशालीसोबतच्या घटस्फोटाच्या केवळ सहा दिवसांत ही पोस्ट आल्याने नेटकऱ्यांनी माहीला लक्ष्य केलं होतं. मात्र, आता माहीने स्पष्ट केलंय की हे नातं केवळ मैत्रीचं असून जयच्या संमतीनेच हे सगळं सुरू आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 12, 2026 4:28 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Mahhi Vij: 'जयच्या संमतीनेच मी...', ट्रोल करणाऱ्यांवर अभिनेत्रीचा संताप, दिला शाप देत म्हणाली 'तुम्ही नीच लोक, नरकात जाल'









