रात्री 9 वाजता शर्मिलाच्या रुममध्ये शिरला, केली घाणेरडी मागणी; नकार देताच 18 वर्षाच्या आरोपीने केला भयावह प्रकार
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Software Engineer Murder: बेंगळुरूमधील सुब्रमण्य लेआउटमध्ये लागलेली आग अपघात नसून थंड डोक्याने केलेली हत्या असल्याचा धक्कादायक खुलासा पोलिस तपासात झाला आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर शर्मिला कुशालप्पा यांचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाल्याचे फॉरेन्सिक अहवालातून स्पष्ट झाले आहे.
बेंगळुरू: कर्नाटकची राजधानी बेंगळुरूच्या पूर्व भागातील सुब्रमण्य लेआउटमध्ये 3 जानेवारीच्या रात्री लागलेल्या आगीमागचे रहस्य आता उघड झाले आहे. सुरुवातीला अपघात म्हणून समोर आलेले हे प्रकरण प्रत्यक्षात हत्या असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. 34 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर शर्मिला कुशालप्पा यांचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाल्याचे फॉरेन्सिक अहवालातून निष्पन्न झाले आहे.
advertisement
दक्षिण कन्नड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या शर्मिला एका नामांकित आयटी कंपनीत कार्यरत होती. 3 जानेवारीच्या रात्री त्यांच्या फ्लॅटमध्ये आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आग विझवल्यानंतर बेडरूममध्ये शर्मिलाचा मृतदेह आढळून आला. सुरुवातीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक तपासणीनंतर हत्या झाल्याचे स्पष्ट झाले.
advertisement
विशेष म्हणजे ज्या खोलीत आग लागली होती ती शर्मिलाच्या फ्लॅटमेटची होती. संबंधित फ्लॅटमेट 14 नोव्हेंबरपासून आसाममध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या तपासादरम्यान पोलिसांचा संशय शर्मिलाचा शेजारी कर्नल कुरई याच्यावर गेला.
शेजारी राहणारा तरुण अटकेत
या प्रकरणात पोलिसांनी 18 वर्षीय कुरई या आरोपीला अटक केली आहे. तो विराजपेटचा रहिवासी असून, बेंगळुरूमध्ये आपल्या एकट्या आईसोबत शर्मिलाच्या शेजारी राहत होता. तो सध्या पीयूसीचा विद्यार्थी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
advertisement
तपासानुसार घटनेच्या दिवशी सायंकाळी सुमारे 9 वाजता आरोपी स्लायडिंग खिडकीतून शर्मिलाच्या फ्लॅटमध्ये शिरला. त्याने शर्मिलाकडे शारीरिक संबंधांची मागणी केली. शर्मिलाने विरोध केल्यानंतर आरोपीने तिच्यावर हल्ला केला. यानंतर दोघांमध्ये झटापट झाली.
पुरावे नष्ट करण्यासाठी आग
पोलिसांनी सांगितले की आरोपीने शर्मिलाचे तोंड आणि नाक दाबून तिला गुदमरवले, त्यामुळे ती बेशुद्ध झाली. झटापटीदरम्यान तिला किरकोळ दुखापत होऊन रक्तस्रावही झाला. यानंतर आरोपीने खोलीतील कपडे व इतर वस्तू एकत्र करून बेडवर ठेवले आणि आग लावली, जेणेकरून पुरावे नष्ट होतील. हत्या केल्यानंतर तो शर्मिलाचा मोबाईल फोन घेऊन घटनास्थळावरून पळून गेला.
advertisement
पोस्टमार्टम अहवालानुसार शर्मिलाचा मृत्यू दम घुटल्यामुळे झाला आहे. आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 103(1) (हत्या), 64(2), 66 आणि 238 (पुरावे नष्ट करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 12, 2026 4:26 PM IST
मराठी बातम्या/देश/
रात्री 9 वाजता शर्मिलाच्या रुममध्ये शिरला, केली घाणेरडी मागणी; नकार देताच 18 वर्षाच्या आरोपीने केला भयावह प्रकार








