Friday Release : 19 सप्टेंबरच्या शुक्रवारी 3 नाही 4 सिनेमे, नागराज मंजुळेंचा 'साबर बोंडा' देणार टक्कर?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Friday Releas : 19 सप्टेंबर 2025 रोजी एक दोन नाही तर तब्बल 4 मराठी सिनेमे रिलीज होत आहेत. कोणते आहेत ते सिनेमे?
मुंबई : 19 सप्टेंबरच्या शुक्रवारी मराठीत एक दोन नाही तर चार सिनेमे रिलीज होत आहेत. 12 सप्टेंबरच्या शुक्रवारी 3 मराठी सिनेमे रिलीज झाले होते. जे बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहेत. त्यातही दशावतार सिनेमानं बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई केली. आरपार आणि बिन लग्नाची गोष्ट हे सिनेमे कमाईच्या बाबतीत मागे पडले असले तरी दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांची आणि समीक्षकांची पसंती मिळतेय.
एकाच दिवशी तीन मराठी सिनेमे रिलीज करण्याच्या निर्मात्याच्या निर्णयावर अनेकांनी टीका केली. त्यानंतर आता दुसऱ्या आठवड्यातही एकाच दिवशी चार मराठी सिनेमे एकत्र रिलीज होणार आहेत.
19 सप्टेंबर 2025 ला रिलीज होणारे मराठी सिनेमे कोणते?
advertisement
आतली बातमी फुटली - हा कॉमेडी क्राइम ड्रामा असलेला सिनेमा आहे. नातेसंबधावर भाष्य करतानाच प्रेमाचे वेगवेगळे कंगोरे या सिनेमात दाखवण्यात आलेत. अभिनेते मोहन आगाशे, अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी, पॉवरपॅक्ड अभिनेता सिद्धार्थ जाधव असे मराठीतले नामवंत चेहरे या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. या तिघांसोबत विजय निकम, भारत गणेशपुरे, आनंदा कारेकर, प्रीतम कागणे, त्रिशा ठोसर या सिनेमात महत्त्वाच्या भुमिकेत आहेत.
advertisement
कुर्ला टू वेंगुर्ला - या सिनेमात ग्रामीण भागातील मुलांच्या रखडणाऱ्या लग्नाचा संवेदनशील विषय रंजकपणे हाताळण्यात आला आहे. अभिनेते वीणा जामकर, प्रल्हाद कुडतरकर, वैभव मांगले, सुनील तावडे, स्वानंदी टिकेकर, साईंकित कामत अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात आहे.
advertisement
अरण्य - हा सिनेमा सत्य घटनांवर प्रेरित आहे. गडचिरोलीच्या खऱ्या जंगलात हा सिनेमा शूट करण्यात आलाय. हार्दिक जोशी, वीणा जगताप, हिृतीका पाटील, विजय निकम, सुरेश विश्वकर्मा, चेतन चावडा आणि अमोल खापरे सिनेमात प्रमुख भुमिकेत आहेत.
advertisement
साबर बोंडा - रोहन परशुराम कानवडे यांची ही मनाला भिडणारी गोष्ट आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे या सिनेमाचे निर्माते आहेत. प्रेम, दु:ख आणि कुटुंबाला दिलेलं ताकदीचं अर्पण दाखवण्या आलं आहे.
advertisement
हा सिनेमा आतापर्यंत 25 हून अधिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत दाखवण्यात आला आहे. सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार मिळणारा हा पहिला भारतीय सिनेमा आहे. सिनेमाला ग्रँड ज्युरी पुरस्कार मिळाला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 18, 2025 6:31 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Friday Release : 19 सप्टेंबरच्या शुक्रवारी 3 नाही 4 सिनेमे, नागराज मंजुळेंचा 'साबर बोंडा' देणार टक्कर?