KDMC परिसरात अग्नीशस्त्रांबद्दलचे नियम धाब्यावर? परवानगी नसतानाही दिवसाढवळा वावर
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
KDMC News : केडीएमसीच्या मुख्यालयाच्या परिसरामध्ये अग्नीशस्त्रे घेऊन फिरण्याची परवानगी कोणी दिली? असा सवाल सध्या विचारला जातोय. जर कोणती विपरीत घटना घडली तर, त्याला जबाबदार कोण असा सुद्धा प्रश्न विचारला जात आहे.
कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रामध्ये अनेकदा वाद झाल्याचे आपण पाहिले असतील. त्या वादाचे रूपांतर पुढे वादामध्ये देखील झाल्याचे आपण अनेकदा पाहिले असतील. कोणत्या ना कोणत्या कारणास्तव केडीएमसी क्षेत्रात वाद होत असताना आता अशातच सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही अंगरक्षकांच्या हातामध्ये शस्त्र असल्याचे दिसत आहे. केडीएमसीच्या मुख्यालयाच्या परिसरामध्ये अग्नीशस्त्रे घेऊन फिरण्याची परवानगी कोणी दिली? असा सवाल सध्या विचारला जातोय. जर कोणती विपरीत घटना घडली तर, त्याला जबाबदार कोण असा सुद्धा प्रश्न विचारला जात आहे.
केडीएमसीच्या मुख्यालयात अनेकदा राडे झाले आहेत. याच राड्यावरून पालिका प्रशासनाला लक्ष्य केले गेले आहे होते. त्यामुळे पालिका मुख्यालयात येत असताना कोणत्याही प्रकारचे अग्नीशस्त्र बाळगू नये असा नियम काढला गेला होता.. मात्र आज केडीएमसीत काही विषयावर आयुक्तांसोबत बैठक होती. या बैठकीसाठी स्थानिक काही नेते मंडळी आली होती. त्यांच्यासोबत अग्नीशस्त्रे घेऊन काही अंगरक्षक मुख्यालयात परिसरात उघडपणे फिरताना दिसली. त्यामुळे कोणतीही अप्रिय घटना घडल्यास त्याचा जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत केडीएमसीच्या उपायुक्त वंदना गुळवे यांना पत्रकारांनी विचारणा केली महापालिका आवारात अग्नीशस्त्रे घेऊन येण्याची परवानगी आहे का? त्यावर त्यांनी सांगितले की, आम्ही माहिती घेऊन सांगतो, मात्र कॅमरासमोर बोलण्यास नकार दिलाय.
advertisement
गेल्या काही महिन्यांपूर्वी केडीएमसी क्षेत्रामध्ये अग्नीशस्त्र वापरू नये, असा नियम आयुक्तांनी केला होता. पण तरीही देखील हा नियम धाब्यावर बसवून काही अंगरक्षक महानगर पालिकेच्या मुख्यालयाच्या परिसरात अग्नीशस्त्र वावरताना दिसत आहेत. यांच्यासोबत अनेक नेते मंडळी सुद्धा दिसत आहेत. अग्नीशस्त्र घेऊन वावरत असताना काही चुकीचं घडू नये, ही गोष्ट महत्त्वाची आहे. जर समजा काही घडलंच तर त्याला जबाबदार कोण ? असा सवाल सध्या नागरिक विचारत आहेत. संबंधित प्रकरणाबद्दल पत्रकारांनी केडीएमसीच्या उपायुक्त वंदना गुळवे यांना विचारणा केली असता महापालिका आवारात अग्नीशस्त्रे घेऊन येण्याची परवानगी आहे का? त्यावर त्यांनी सांगितले की, "आम्ही माहिती घेऊन सांगतो." पण त्यांनीही प्रतिक्रिया कॅमेऱ्यासमोर देण्यास नकार दिलाय.
Location :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
September 18, 2025 6:06 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
KDMC परिसरात अग्नीशस्त्रांबद्दलचे नियम धाब्यावर? परवानगी नसतानाही दिवसाढवळा वावर