नॅशनल क्रश रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडानी गुपचूप उरकला साखरपुडा, लग्नाची तारीखही आली समोर
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांनी अत्यंत खासगी पद्धतीने साखरपुडा केल्याचं वृत्त समोर आलं आहे.
मुंबई : अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांनी अत्यंत खासगी पद्धतीने साखरपुडा केल्याचं वृत्त समोर आलं आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार रश्मिका आणि विजय देवरकोंडा फेब्रुवारी 2026 मध्ये लग्न करणार आहेत. रश्मिका आणि विजय या जोडप्याने त्यांचा साखरपुडा झाल्याची घोषणा अजून केलेली नाही, या दोघांनाही हा साखरपुडा गुप्त ठेवायचा आहे. M9 ने या दोघांचा साखरपुडा झाल्याचं वृत्त दिलं आहे.
रश्मिकाने गुरूवारी दसऱ्यानिमित्त तिचा साडीमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता, ज्यामुळे चाहत्यांनी तिच्या लग्नाबद्दलच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या.
advertisement
दसऱ्याच्या निमित्ताने, 'थामा' अभिनेत्रीने पारंपारिक पोशाखात कपाळावर कुंकू लावलेला एक फोटो शेअर केला होता. "दसऱ्याच्या शुभेच्छा माझ्या प्रिये... या वर्षी, थम्मा ट्रेलर आणि आमच्या गाण्यावर तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल मी खूप आभारी आहे... तुमचे संदेश, तुमचा उत्साह, तुमचा सततचा पाठिंबा, तुम्ही माझ्यासाठी प्रत्येक क्षण मोठा आणि आनंदी बनवता आणि प्रमोशन दरम्यान तुम्हाला सर्वांना खूप आनंदी पाहण्यासाठी मी उत्सुक आहे..." असं कॅप्शन रश्मिकाने तिच्या फोटोला दिलं.
advertisement
गेल्या अनेक वर्षांपासून, दोन्ही अभिनेत्यांचे चाहते या घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत. रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांच्या साखरपुड्याचं वृत्त समोर आल्यामुळे इंडस्ट्रीमध्ये तसंच त्यांच्या चाहत्यांमध्ये सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 03, 2025 11:23 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
नॅशनल क्रश रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडानी गुपचूप उरकला साखरपुडा, लग्नाची तारीखही आली समोर

