advertisement

OTT Trending: 1 तास 46 मिनिटांची फाडू फिल्म, ब्लॉकबस्टर सिनेमांनाही टाकलं मागे; ओटीटीवर घातलाय धुमाकूळ

Last Updated:

OTT Trending: सस्पेन्स, थ्रिलर, मिस्ट्री सिनेमा आणि वेब सीरीजची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चाललेली पाहायला मिळत आहे. थिएटर असो किंवा ओटीटी या जॉनरचा प्रेक्षकवर्ग जास्त आहे.

1 तास 46 मिनिटांची फाडू फिल्म
1 तास 46 मिनिटांची फाडू फिल्म
मुंबई : सस्पेन्स, थ्रिलर, मिस्ट्री सिनेमा आणि वेब सीरीजची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चाललेली पाहायला मिळत आहे. थिएटर असो किंवा ओटीटी या जॉनरचा प्रेक्षकवर्ग जास्त आहे. अशाच एका ब्लॉकबस्टर सिनेमाविषयी जाणून घेऊया जो सध्या ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे.
जर तुम्हाला वीकेंडला कुटुंबासोबत बसून एखादा थरारक चित्रपट पाहायचा असेल, तर Amazon Prime Video वरील एका सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. हा चित्रपट कमी बजेटचा असूनही, प्रदर्शित होताच त्याने ओटीटीवर धुमाकूळ घातला आहे.
आपण बोलत असलेल्या या सिनेमाचं नाव आहे, 'शो टाइम'. या सिनेमाची कथा एका मध्यमवर्गीय कुटुंबाभोवती फिरते. सूर्या (नवीन चंद्रा) आणि त्याची पत्नी (कामाक्षी भास्करला) यांच्या घरात एका रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलते. एका रात्री ते घरी आरामात टीव्ही पाहत असतात, पण त्यांना कल्पनाही नसते की लवकरच एक अशी घटना घडणार आहे, ज्यामुळे त्यांचे आयुष्य पूर्णपणे विस्कटून जाईल. एका खुनाच्या घटनेमुळे त्यांच्या आयुष्यात होणारी उलथापालथ या चित्रपटात अतिशय उत्तम प्रकारे दाखवण्यात आली आहे.
advertisement
चित्रपटाचे दिग्दर्शन मदन दक्षिणामूर्ती यांनी केले आहे. त्यांनी अत्यंत कमी बजेटमध्ये एक जबरदस्त क्राइम थ्रिलर बनवला आहे. यात नवीन चंद्रा, कामाक्षी भास्करला यांच्यासोबत व्हीके नरेश आणि राजा रवींद्र यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या कलाकारांच्या अभिनयामुळे कथेला आणखी बळकटी मिळाली आहे.
हा चित्रपट 4 जुलै 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि तिथेही त्याने चांगली कमाई केली. मात्र, 25 जुलै 2025 रोजी तो Amazon Prime Video वर प्रदर्शित झाला आणि त्याने ओटीटीच्या जगात अक्षरशः त्सुनामी आणली. रिलीज होताच हा चित्रपट प्राइम व्हिडिओच्या टॉप 10 ट्रेंडिंग लिस्टमध्ये 10 व्या क्रमांकावर पोहोचला.
advertisement
दरम्यान, फक्त 13 दिवसांत या चित्रपटाने अनेक मोठ्या आणि ब्लॉकबस्टर चित्रपटांना मागे टाकले आहे. प्रेक्षकांचा या चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद पाहता, लवकरच तो टॉप 5 मध्येही सामील होऊ शकतो, अशी शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
OTT Trending: 1 तास 46 मिनिटांची फाडू फिल्म, ब्लॉकबस्टर सिनेमांनाही टाकलं मागे; ओटीटीवर घातलाय धुमाकूळ
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement